भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी (दि. 05 जुलै) वेस्ट इंडिज दौऱ्यातील 5 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघाचा स्टार युवा फलंदाज तिलक वर्मा याला पहिल्यांदाच भारतीय संघात जागा मिळाली. अशात या संघात निवडल्या गेल्यामुळे सूर्यकुमार यादवने तिलकला शुभेच्छा दिल्या.
खरं तर, वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies) संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच, उपकर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तिलक वर्मा (Tilak Varma) भारतीय टी20 संघात सामील झाल्यानंतर सूर्याने ट्वीट करत त्याला शुभेच्छा दिल्या. सूर्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “तिलक वर्मा पहिल्यांदा टी20 संघात निवडल्याबद्दल शुभेच्छा. मी तुझ्यासाठी खूप खुश आणि उत्साही आहे.”
Congratulations on your maiden T20I call up @TilakV9 ????
So happy and excited for you????— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) July 5, 2023
वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
महत्त्वाचं म्हणजे, बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यामध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी ब्रायन लारा स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे.
तिलक वर्माने कसे केले प्रभावित?
खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा (Suryakumar Yadav And Tilak Varma) यांनी आपल्या प्रदर्शनाने सर्वांनाच प्रभावित केले होते. तिलकने 11 सामन्यात फलंदाजी करताना 42.87च्या सरासरीने 343 धावांचा पाऊस पाडला होता. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, तिलक दुखापतग्रस्त असल्यामुळे काही सामन्यांमधून बाहेर होता. त्याने प्ले-ऑफमध्ये पुनरागमन करत एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 सामन्यात अनुक्रमे 26 आणि 43 धावांची खेळी साकारली होती.
मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल 2023मधील प्रवास दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात संपला होता. मुंबईला गुजरात टायटन्स संघाकडून 62 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. सूर्यकुमार यादव आयपीएल 2023 हंगामात मुंबईचा सर्वाधिक धावा कर्णधारा फलंदाज होता. त्याने 16 सामन्यात 43.21च्या सरासरीने 605 धावांचा पाऊस पाडला होता. (Cricketer suryakumar yadav congratulates this indian cricketer for selecting in team india)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
ईशान किशन, शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार
महत्वाच्या बातम्या-
तोच चेंडू, तीच चूक! उनाडकटने सराव सामन्यात काढला विराटचा काटा, व्हिडिओ तुफान व्हायरल
शानदार प्रदर्शन करूनही स्टार क्रिकेटरचा टीम इंडियातून पत्ता कट, माजी प्रशिक्षकापुढेच आलं डोळ्यात पाणी