---Advertisement---

जगभरातील गोलंदाजांमध्ये सूर्याने घेतले ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाचे नाव, वाचा कोण आहे तो खेळाडू

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 11:13 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 गाजवणारा भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या भलताच चर्चेत आहे. सूर्यकुमारने विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. आता वनडे मालिकेतही त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे. अशात त्याने एका गोष्टीचा खुलासा केला आहे की, त्याला कोणत्या गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करायला आवडेल. त्याने पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाविरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सूर्याने कुणाचे घेतले नाव?
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने माध्यमांशी बोलताना काही प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये एक प्रश्न त्याच्या आवडीच्या वेगवान गोलंदाजाशी निगडीत होता. यावेळी त्याला विचारण्यात आले की, असा कोणता माजी गोलंदाज आहे, ज्याच्याविरुद्ध त्याला फलंदाजी करायला आवडली असती. यावेळी त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम (Wasim Akram) यांचे नाव घेतले.

विश्वचषकात वसीम यांनी सूर्यकुमार याच्या फलंदाजीचे कौतुक केले होते. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने म्हटले होते की, “मला असे वाटते की, तो दुसऱ्याच कुठल्या ग्रहावरून आला आहे. तो इतर सर्व फलंदाजांच्या तुलनेत एकदम वेगळा दिसतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, यावर्षी त्याने जितक्याही धावा केल्या आहेत. माझ्या मते, तो 2022मध्ये 1000 आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.”

विराट कोहलीने त्याच्या कामगिरीबद्दल मैदानावर केलेल्या प्रशंसेचा फोटो त्याला कुणी भेट म्हणून दिला, तर तो कुठे ठेवेल? या प्रश्नाचे उत्तर त्याने मजेशीररीत्या दिले. तो म्हणाला की, “मी तो फोटो आपल्या ट्रॉफीच्या रूममध्ये सर्वात पुढे ठेवेल आणि प्रत्येक दिवशी सकाळी लवकर उठून ते नक्की पाहील.”

जर त्याला एक शॉट चोरायची संधी मिळाली, तर त्याला कसा आणि कोणता शॉट चोरायला आवडेल? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने रोहित शर्मा याचे नाव घेतले. त्याने म्हटले की, “रोहितचा पुल शॉट मला खूप आवडतो. मला तोच चोरायला आवडेल.”

न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. (cricketer suryakumar yadav picks wasim akram from former bowler to face)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू भारताचा आक्रमक कर्णधार होऊ शकतो, गौतम गंभीर याने केली भविष्यवाणी
दुसऱ्या वनडेतून ‘या’ दोन खेळाडूंची होऊ शकते हाकालपट्टी, भारताच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---