---Advertisement---

WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल

Virat-Kohli-And-Anushka-Sharma
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी पराभूत केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना लंडनच्या के ओव्हल मैदानात पार पडला होता. या सामन्यानंतर भारतीय संघाचे अनेक खेळाडू लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत, तर काही खेळाडू मायदेशी परतले आहेत. पुढील महिन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडिज संंघाचा दौरा करायचा आहे. त्यापूर्वी खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. अंतिम सामन्यानंतर लंडनमध्येच असलेला विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत वेळ घालवत आहे.

नुकतेच, विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लंडनमध्ये कृष्णदास कीर्तन शोचा आनंद घेताना दिसले. खरं तर, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मागील काही काळापासून धार्मिक ठिकाण आणि तीर्थ स्थळांचा दौरा करताना दिसला आहे.

सन 2023च्या सुरुवातीला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान विराट आणि अनुष्का वृंदावन (नीब करोली बाबा आश्रम) आणि उज्जैनच्या महाकाल मंदिराची यात्रा करताना दिसले होते. त्यावेळी दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

खरं तर, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील दोन्ही डावात विराट खास कामगिरी करू शकला नाही. दुसऱ्या डावात सर्वांना असे वाटले की, तो मोठी खेळी साकारेल, परंतु तो 49 धावांवर तंबूत परतला. विराटची विकेट पडण्यासोबतच भारतीय संघाचा दुसरा डावही 234 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी डब्ल्यूटीसी किताब आपल्या नावावर केला.

विराट कोहलीसाठी आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम चांगला गेला होता. त्याने 14 सामन्यात 53.25च्या सरासरीने 639 धावांचा पाऊस पाडला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच, त्याची बॅट शांत झाली. आता विराट वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना दिसणार आहे. विंडीज दौऱ्यावर भारतीय संघाला 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळायचे आहेत. भारताचा हा दौरा 12 जुलैपासून सुरू होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालेल. (cricketer virat kohli and anushka sharma at the krishna das kirtan show in london)

महत्वाच्या बातम्या-
संतापलेल्या आफ्रिदीचा पीसीबीला घरचा आहेर; अहमदाबाद खेळपट्टीविषयी म्हणाला, ‘तिथं काय आगीचा पाऊस पडतोय?’
बांगलादेशने उद्ध्वस्त केले कसोटी क्रिकेटचे रेकॉर्ड, अफगाणिस्तावर मिळवला 500हून अधिक धावांनी दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---