---Advertisement---

विराट आणि ईशानच्या डान्सने दणाणून सोडले ईडन गार्डन्स, बेधुंद होऊन नाचतानाचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल

Virat-Kohli-And-Ishan-Kishan-Dance
---Advertisement---

भारतीय संघाने 2023 या नवीन वर्षीची सुरुवात अगदी दणक्यात केली होती. त्यांचे हेच प्रदर्शन आता कायम आहे. श्रीलंकेविरुद्धची टी20 मालिका 2-1ने आपल्या नावावर केल्यानंतर आता वनडे मालिकाही भारताने खिशात घातली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा वनडे सामना गुरुवारी (दि. 12 जानेवारी) ईडन गार्डन्स, कोलकाता येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 4 विकेट्सने विजय मिळवत मालिकेतील दुसरा सामनाही आपल्या नावावर केला. या विजयानंतर भारतीय संघाचे दोन धुरंधर विराट कोहली आणि ईशान किशन यांनी एकत्र मिळून जोरदार डान्स केला. आता त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील दुसऱ्या वनडे सामन्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे.

विराट आणि किशन डान्स व्हिडिओ
कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये विराट कोहली आणि ईशान किशन डान्स (Virat Kohli And Ishan Kishan Dance) करताना दिसले. यादरम्यान स्टँड्समध्ये असणाऱ्या प्रेक्षकांनी त्यांचा व्हिडिओ शूट करत व्हायरल केला. व्हिडिओत दिसते की, विराट आणि ईशान धमाकेदार डान्स करत आहेत. तसेच, चाहतेही त्यांचा उत्साह वाढवत आहेत.

पहिल्या सामन्यात विराटने झळकावले होते शतक
भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या सुरुवातीचे दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वनडेत विराट कोहली (Virat Kohli) याने 113 धावांची वादळी खेळी साकारत शतक झळकावले होते. दुसरीकडे, तो दुसऱ्या वनडेत 4 धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे, बांगलादेशविरुद्ध वनडेत द्विशतक झळकावणाऱ्या ईशान किशन (Ishan Kishan) याला दोन्ही सामन्यात एकही संधी मिळाली नाही.

भारतीय संघ वनडे मालिकेत 2-0ने आघाडीवर
दुसऱ्या वनडेत श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पाहुण्या संघाचा डाव 39.4 षटकात 215 धावांवरच संपुष्टात आला होता. त्यानंतर 216 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने 43.2 षटकात 6 विकेट्स गमावत 219 धावा चोपल्या आणि सामना खिशात घातला.

या सामन्यात कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी कुलदीपला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अशात आता तिसरा सामना रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करेल, तर श्रीलंका संघ एकतरी विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (cricketer virat kohli and ishan kishan dancing after the series win against sri lanka ind vs sl)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुल द्रविडने सोडली टीम इंडिया! तब्येतीच्या समस्येमुळे एकटाच बंगळुरूला रवाना, तिसऱ्या वनडेसाठी…
अक्षर पटेलने वाढवले रवींद्र जडेजाचे टेंशन! सामन्यानंतरचे जड्डूचे ट्वीट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---