बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा याने शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील वेगवान शतक होते. त्याने यादरम्यान 130 चेंडूत 102 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 13 चौकारांचीही बरसात केली. पुजाराने हे कसोटी शतक 2019नंतर ठोकले आहे. ज्यावेळी त्याने त्याचे शतक साजरे केले, तेव्हा विराट कोहली त्याच्यासोबत खेळपट्टीवर उपस्थित होता. शतक झळकावताच पुजाराच्या आधी विराटच सेलिब्रेशन करू लागला. या दोघांचाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पुजारापेक्षा जास्त विराट होता खुश
विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघातील असा खेळाडू आहे, जो आपल्या शतकाव्यतिरिक्त इतरांच्या शतकावरही जबरदस्त सेलिब्रेशन करतो. इतकंच काय तर विराट शतक करणाऱ्या फलंदाजापूर्वी स्वत:च जल्लोष करू लागतो. यावेळी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्यासोबतही विराटने असेच काहीसे केले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, चौकार मारल्यानंतर विराट पुजाराच्या आधीच त्याच्या शतकाचे सेलिब्रेशन करू लागतो. पुढे विराटनंतर पुजारा हेल्मेट काढून बॅट हवेत फिरवत शतकाचे सेलिब्रेशन करतो.
विराट कोहलीचा अंदाज जुणाच
खरं तर, विराटने इतर खेळाडूंच्या शतकावर सेलिब्रेशन करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशन (Ishan Kishan) याच्या द्विशतकावरही याच अंदाजात सेलिब्रेशन केले होते. ईशानच्या द्विशतकानंतर विराटने त्याच्याआधीच जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. ईशानने द्विशतकासाठी एकेरी धाव घेताच, नॉन स्ट्रायकर एंडवर असणाऱ्या विराटने त्याच्या आधी आपली बॅट हवेत फिरवत सेलिब्रेशन सुरू केले होते.
Cheteshwar Pujara deserves every bit of applause. He played brilliantly in England and Australia but was unable to get to the landmark figure. Well played! #CheteshwarPujara #INDvBAN https://t.co/u4OeEL18xE
— Kunal (@kunaljoshi93) December 16, 2022
Virat Kohli the most selfless player ever https://t.co/973w4KXT6S
— leisha (@katyxkohli17) December 16, 2022
पुजाराव्यतिरिक्त गिलचेही शतक
या सामन्यातील दुसऱ्या डावात पुजाराव्यतिरिक्त शुबमन गिल (Shubman Gill) यानेही शतक झळकावले. त्याने 152 चेंडूत 110 धावा करत शतक साजरे केले. यापूर्वी पुजाराने पहिल्या डावात 90 धावा केल्या होत्या.
𝐓𝐡𝐢𝐬 𝐭𝐢𝐦𝐞 𝐡𝐞 𝐜𝐨𝐧𝐯𝐞𝐫𝐭𝐬 𝐢𝐭 💯🙌
A long wait of 1️⃣4️⃣4️⃣3️⃣ days & 5️⃣2️⃣ innings is over for @cheteshwar1 😍 as he reaches his 1️⃣9️⃣th 𝑻𝒆𝒔𝒕 𝒄𝒆𝒏𝒕𝒖𝒓𝒚, also his fastest ever 👏⚡#Pujara #BANvIND #INDvsBAN pic.twitter.com/sa4dGikVyX
— Sony LIV (@SonyLIV) December 16, 2022
भारतीय संघाने बांगलादेशपुढे विजयासाठी 513 धावांचे आव्हान ठेवले आहे. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी यजमान संघाची धावसंख्या 42 धावा इतकी आहे. तसेच, नजमुल हुसेन शांतो (25) आणि झाकिर हसन (17) नाबाद आहेत. (cricketer virat kohli celebrate cheteshwar pujara s century before him watch video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारी रे! शुबमन गिलने शतक ठोकताच ‘या’ खेळाडूंपुढे झुकवली मान, पाहा व्हिडिओ
एकाच क्लिकवर जाणून घ्या आयपीएल 2023 लिलावाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे, वाचा सविस्तर