---Advertisement---

विराट इतका यशस्वी कसा झाला? गुपीताचा खुलासा करत स्वत:च म्हणाला, ‘प्रत्येक दिवशी, प्रत्येक सत्रात मी…’

Virat-Kohli
---Advertisement---

जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये भारतीय संघाचा विस्फोटक खेळाडू विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराट सध्या विश्वचषक 2023 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत तो शानदार फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. अशात विराटने सातत्याने करत असलेल्या शानदार प्रदर्शनाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितले आहे की, तो सलग इतके चांगले प्रदर्शन कसे करत आहे.

विराट कोहली (Virat Kohli) याच्या मते, तो सर्वोत्तम बनण्यावर लक्ष देत नाही, तर सतत स्वत:ला चांगले बनवण्यावर भर देतो. त्याच्यानुसार, तो सतत या गोष्टीवर लक्ष देतो की, तो कशाप्रकारे स्वत:मध्ये चांगली सुधारणा करेल.

विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील विराटची कामगिरी पाहायची झाली, तर त्याने अनेक शानदार खेळी साकारल्या आहेत. त्याने धावांचा पाठलाग करताना अनेक मोठ्या खेळी उभारल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याचे आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 48 शतकेही झाली आहेत. तसेच, तो सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा विक्रम मोडण्यापासून फक्त 2 शतके दूर आहे. मागील सामन्यात तो शतकाच्या जवळ पोहोचला होता, पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला होता.

‘मी स्वत:मध्ये सुधारणा करण्यावर जोर देतो’
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराटने आपल्या यशाचा मंत्र सांगितला. विराट म्हणाला, “प्रत्येक दिवशी, प्रत्येक सराव सत्रात, प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक हंगामात स्वत:ला चांगले कसे करू शकतो, यावर मी काम केले आहे. जर ही मानसिकता नसेल, तर सलग इतके चांगले प्रदर्शन करणे शक्य होणार नाही. जर प्रदर्शनच तुमचे लक्ष्य आहे, तर काही दिवसांनंतर तुम्हाला चांगले वाटेल आणि तुमच्या खेळावर काम करणे बंद कराल. माझे नेहमीच श्रेष्ठ बनण्यावर नाही, तर सुधारणेवर जोर राहिला आहे.”

पुढे बोलताना विराट असेही म्हणाला की, “सर्वोत्तम बनण्याची व्याख्या काय असते, हे मला माहिती नाही. याची कोणतीही मर्यादा नाहीये. त्यामुळे प्रत्येक दिवशी मी माझ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे कामगिरी आपोआप होते. कारण, संघाला विजय कसा मिळवून द्यायचा, याचा तुम्ही विचार करता.”

विराटची स्पर्धेतील कामगिरी
या स्पर्धेत विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने 5 सामने खेळताना तब्बल 118च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतकही निघाले आहे. (cricketer virat kohli reveals his success mantra)

हेही वाचा-
दिल्लीतील ‘या’ गोष्टीवर ऑसी खेळाडूंमध्ये दोन गट, मॅक्सवेल नाराज, तर वॉर्नर खुश; नेमकं प्रकरण काय?
भारतात नाही, तर ‘या’ देशात होणार IPL 2024चा लिलाव? तारखांबाबत मोठी अपडेट आली समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---