---Advertisement---

दिल्लीतील ‘या’ गोष्टीवर ऑसी खेळाडूंमध्ये दोन गट, मॅक्सवेल नाराज, तर वॉर्नर खुश; नेमकं प्रकरण काय?

Glenn-Maxwell-On-Light-Show
---Advertisement---

क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे स्टेडिअममधील लाईट शो. चाहत्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मैदानात लाईट शोचे आयोजन झाले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल लाईट शो बाबत भडकला आहे. त्याने संताप व्यक्त करत म्हटले की, यामुळे खेळाडूंना त्रास होतो. मात्र, त्याचाच संघसहकारी डेविड वॉर्नर याने लाईट शोचे समर्थन केले आहे.

वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेदरम्यान दिल्ली आणि धरमशाला यांच्यासह अनेक स्टेडिअममध्ये ड्रिंक्स ब्रेकदरम्यान लाईट शो (Light Show) आयोजित केले जातात. यादरम्यान संपूर्ण स्टेडिअमची लाईट बंद करून रंगीत लाईट शो लावला जातो. स्पर्धेच्या 24व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स (Australia vs Netherlands) संघाच्या सामन्यातही असेच काहीसे झाले. मात्र, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला ही गोष्ट आवडली नाही.

सामन्यानंतर मॅक्सवेल म्हणाला की, सामन्यादरम्यान लाईट शो केल्यामुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होते. तो म्हणाला, “बिग बॅश लीगदरम्यान पर्थमध्येही असाच लाईट शो झाला होता. मला त्यावेळी डोकेदुखी झाली होती. गोष्टी व्यवस्थित पाहण्यासाठी मला जरा वेळ लागला. क्रिकेटपटूंसाठी हे बिल्कुल चांगले नाही. कारण, यामुळे डोळ्यांना ऍडजस्ट करण्यात बराच वेळ लागतो. हे चाहत्यांसाठी तर चांगलेच आहे, पण खेळाडूंसाठी खूपच खराब आहे.”

डेविड वॉर्नरकडून पाठिंबा
मात्र, वॉर्नरने या लाईट शोला पाठिंबा दिला. तो म्हणाला की, हे चाहत्यांसाठी खूपच चांगले आहे. त्यांच्याशिवाय आपण काहीच नाहीत. वॉर्नर ट्वीट करत म्हणाला की, “मला लाईट शो खूपच आवडला. मैदानात काय वातावरण असते. हे सर्वकाही चाहत्यांसाठी आहे. तुमच्याशिवाय आम्ही काहीच करू शकणार नाहीत, जे आम्हाला आवडते.”

सामन्याविषयी बोलायचं झालं, तर वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा 24वा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या सामन्यात त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध 309 धावांनी विजय मिळवला. हा धावांच्या हिशोबाने विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. तसेच, वनडे इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने 40 चेंडूत शतक ठोकले. त्याने 44 चेंडूत 106 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तसेच, डेविड वॉर्नर यानेही 93 चेंडूत 104 धावा करत शतक झळकावले. (cricketer david warner pushes back on glenn maxwells remarks of light show in delhi)

हेही वाचा-
भारतात नाही, तर ‘या’ देशात होणार IPL 2024चा लिलाव? तारखांबाबत मोठी अपडेट आली समोर
‘देवा अशी बायको सर्वांना दे…’, धवनने ‘त्या’ महिलेविषयी साधला संवाद; व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---