‘रनमशीन’ विराट कोहली याने आपला 500वा आंतरराष्ट्रीय सामना यादगार बनवला. त्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी साकारली. हे त्याचे कसोटी कारकीर्दीतील 29वे शतक होते. पहिल्या कसोटीत शतकाला मुकणाऱ्या विराटने दुसऱ्या सामन्यात 206 चेंडूंचा सामना करताना 121 धावा चोपल्या. विराटचे हे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील एकूण 76वे शतक ठरले. विराटने जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत पुनरागमन करण्यात मदत केली.
विराट 121 धावांवर धावबाद
विराट कोहली (Virat Kohli) याने शतक ठोकल्यानंतर वेगाने धावा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्याने वैयक्तिक121 धावसंख्येवर विकेट गमावली. त्याने 99व्या षटक टाकत असलेल्या जोमेल वॉरिकन (Jomel Warrican) याच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे क्षेत्ररक्षण करत असलेला अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph) याने धावत चेंडू उचलला आणि थेट यष्टींवर मारला. यावेळी विराटसारखा चपळ खेळाडूही क्रीझपासून दूर राहिला. त्यामुळे द्विशतकाच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या विराटला आपली विकेट गमवावी लागेल.
A quick throw from Alzarri. The King goes!
Live Scorecard⬇️https://t.co/CyZJAEWnXa#WIHome #RallywithWI pic.twitter.com/5yMxnGm9aq
— Windies Cricket (@windiescricket) July 21, 2023
https://twitter.com/YashCricket3/status/1682431129159348224
दिवसाचे पहिले सत्र पूर्णपणे विराटच्या नावे राहिलं. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांविरुद्ध धावा करण्यात विराटला कसलाच संघर्ष करावा लागला नाही. त्याने आपल्या खेळीदरम्यान 11 चौकार मारले आणि 77 धावा पळून काढल्या. दिवसाची सुरुवात 87 धावांपासून करणाऱ्या विराटने केमार रोच याच्या चेंडूवर चौकारासह शतक पूर्ण केले. विराटचा वेस्ट इंडिजविरुद्ध हे 12वे शतक आहे. तसेच, तो या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॅक कॅलिस याच्यासोबत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध महान फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सर्वाधिक 13 शतके ठोकली आहेत.
भारताचा डाव
भारतीय संघाने पहिल्या डावात 438 धावांचा डोंगर उभारला. यामध्ये विराट कोहलीचे शतक सोडले, तर चार फलंदाजांनी अर्धशतक ठोकले. त्यात रोहित शर्मा (80), रवींद्र जडेजा (61), यशस्वी जयसवाल (57) आणि आर अश्विन (56) यांचा समावेश आहे. यावेळी वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, जेसन होल्डरने 2, तर शॅनन गॅब्रियल याने 1 विकेट नावावर केली. (cricketer virat kohli run out alzarri joseph direct hit wi vs ind 2nd test)
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पण होताच मुकेशने आईला केला पहिला फोन, भावूक व्हिडिओ जिंकतोय सर्वांची मने
धक्कादायक! आशिया चषकाच्या सेमीफायलमध्ये भिडले भारत-बांगलादेशचे खेळाडू, 45 सेकंदाचा व्हिडिओ पाहाच