इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (दि. 21 जुलै) पार पडला. आर प्रेमदासा स्टेडिअम, कोलंबो येथील सामन्यात भारत अ विरुद्ध बांगलादेश अ संघ आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले. उपांत्य सामन्यात भारतीय युवा खेळाडूंनी बांगलादेश अ संघाला 51 धावांनी पराभवाचा धक्का देत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. असे असले, तरीही या सामन्यादरम्यान वातावरण तापल्याचे दिसले. यावेळी खेळाडूंचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. आता यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात बांगलादेश अ संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात 10 विकेट्स गमावत 211 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने जबरदस्त सुरुवात केली. त्यानंतर सामना भारताच्या हातातून निसटताना दिसला. मात्र, ज्यावेळी भारतीय फिरकीपटू निशांत सिंधू याने आपल्या जाळ्यात बांगलादेशच्या फलंदाजांना फसवले, तेव्हा भारतीय संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
बांगलादेशच्या 100नंतर पाहता-पाहताच 5 विकेट्स पडल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेला सौम्य सरकार एक चौकार मारल्यानंतर आपला चौथा चेंडू खेळताना युवराजच्या चेंडूवर विकेट गमावतो. यावेळी तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या निकिन जोस याच्या हातून झेलबाद होतो. या विकेटनंतर भारतीय संघाचा खेळाडू हर्षित राणा (Harshit Rana) हा जास्तच आक्रमक होताना दिसतो. त्यानंतर हर्षित राणा आणि सौम्य सरकार यांच्यात बाचाबाची पाहायला मिळते. मात्र, पंच आणि संघसहकारी मध्यस्थी करत प्रकरण मिटवतात.
Harshit Rana's aggression when Soumya Sarkar out.
Soumya Sarkar showed aggression when Yash Dhull out and this time Rana showed. pic.twitter.com/AjM35Nne2N
— CricketMAN2 (@ImTanujSingh) July 21, 2023
हर्षित राणा काढला राग
खरं तर, हर्षित राणा याने पहिल्या डावाचा बदला घेतल्याचे बोलले जात आहे. कर्णधार यश धूल (Yash Dhull) याची विकेट घेतल्यानंतर सौम्य सरकार (Soumya Sarkar) याने असेच सेलिब्रेशन केले होते. मात्र, जेव्हा भारताची वेळ आली, तेव्हा ही आक्रमकता बाचाबाचीमध्ये बदलली. मात्र, सामना भारताने 51 धावांनी जिंकला. निशांत सिंधूनने या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. मात्र, सामनावीर पुरस्काराचा मानकरी यश धूल ठरला. त्याने या सामन्यात 85 चेंडूत 66 धावा केल्या होत्या. यामध्ये 6 चौकारांचा समावेश होता. (emerging asia cup 2023 verbel fight between saumya sarkar and harshit rana video viral)
महत्त्वाच्या बातम्या-
अमेरिकेत घोंगावलं रसेल नावाचं वादळ! 6 सिक्स मारत चोपल्या 70 धावा, तरीही संघावर पराभवाची नामुष्की
BANW vs INDW : Toss जिंकत बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय, भारत वनडे मालिका जिंकण्यापासून एक पाऊल दूर