आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचे तीन प्रकार आहेत. ज्यातील कसोटी हा सर्वात मोठा क्रिकेट प्रकार आहे. कसोटी क्रिकेट खेळणे प्रत्येकाचे खेळाडूचे स्वप्न असते, पण खूप कमी खेळाडू कसोटी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी होतात. भारतीय संघातही असाच एक खेळाडू आहे, जो जवळपास 7 वर्षांपासून भारतीय संघाचा भाग आहे, पण त्याला कसोटीत खेळण्याची एकही संधी मिळाली नाहीये. विशेष म्हणजे, या खेळाडूने भारतासाठी वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकूण 212 विकेट्स चटकावल्या आहेत.
भारतासाठी कधीच खेळला नाही कसोटी सामना
आयपीएल 2016 (IPL 2016) हंगामातून भारतीय संघाला एक जबरदस्त फिरकीपटू भेटला होता. या खेळाडूने शानदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले होते. हा खेळाडू इतर कुणी नसून युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आहे. चहलने वनडे आणि टी20 क्रिकेट प्रकारात भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र, त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. चहल टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये शानदार विक्रम
चहलने भारतीय संघासाठी पहिला वनडे सामना 2016मध्ये खेळला होता. त्याच वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पणही केले होते. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 72 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 121 विकेट्स नावावर केल्या आहेत. तसेच, चहलने 75 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 91 विकेट्सची नोंद आहे. शानदार आकडेवारी असूनही त्याने आतापर्यंत कसोटी पदार्पण केले नाहीये.
इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी गोलंदाज
युझवेंद्र चहल हा इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्याने आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातच ड्वेन ब्रावो याच्या सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोडला होता. ब्रावोने आयपीएलमध्ये 183 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, आता चहलच्या नावावर 187 विकेट्सचा समावेश झाला आहे. चहलने आयपीएल 2023 हंगामात 14 सामने खेळताना 21 विकेट्स नावावर केल्या होत्या. (cricketer yuzvendra chahal not played a single test match for team india till now)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडमध्ये ‘या’ भेदक गोलंदाजापुढे गिल करणार संघर्ष, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे WTC फायनलपूर्वी मोठे विधान
बेन स्टोक्सने रचला इतिहास! बनला 146 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच कॅप्टन