भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वसीम जाफरने आधुनिक काळातील क्रिकेटपटूंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जाफरने आधुनिक काळात क्रिकेट जगताचा मान मिळविण्यासाठी सर्व क्रिकेट प्रकारामध्ये तितकीच चांगली कामगिरी करावी लागेल असे सांगितले आहे.
जाफरला (Wasim Jaffer) भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) महान खेळाडू समजले जाते. काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधून संन्यास घेतलेल्या जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19,500 धावांचा भला मोठा आकडा पार केला आहे. त्याचबरोबर त्याने भारतीय संघाकडून 31 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत.
क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना जाफर म्हणाला की, “मला वाटते की काळ बदलला आहे. माझ्या काळात राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांसारखे खेळाडू होते. परंतु आता मला असे वाटते की, त्यांना पुरेसा मान मिळाला नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने चाहत्यांचा आणि क्रिकेट जगताचा मान मिळवायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक क्रिकेट प्रकारात धावा कराव्या लागतील.”
आयपीएलमध्ये जाफर खूप कमी काळ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून (Royal Challengers Bangalore) खेळला आहे. आता तो नव्या भूमिकेत क्रिकेटमध्ये पाऊल टाकत आहे. जाफर किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहे.
जाफरला असे वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटला स्वत:चे वेगळे महत्त्व आहे. परंतु रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे.
“एका मोसमात 1000 धावा किंवा 40-50 विकेट्स मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी उच्च दर्जाचे प्रदर्शन करावे लागते. एखादा खेळाडू वर्षानुवर्षे चमकदार कामगिरी करत असेल तर त्याला नक्कीच त्याचे बक्षीस मिळाले पाहिजे,” असेही जाफर यावेळी म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयच्या ऑफिसला लागले टाळे
-टीम इंडियाचा सदस्य नसलेला धोनी खेळतोय हा खेळ
-जड्डूला सर म्हटल्यावर नक्की वाटतं तरी काय?
-आयपीएलसाठी सराव करणारे क्रिकेटर सध्या करताय तरी काय?