मंगळवारी (८ मार्च) जगभर जागतिक महिला दिवस (International Women’s Day) साजरा केला जात आहे. भारतात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल फ्रॅंचायझींनी आपल्यासाठी प्रेरणा असलेल्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन दिल्या आहेत.
त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या महिलांनी प्रेरणा दिली आहे याबद्दल त्यांनी सांगितले आहे. भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar)व्हिडीओ शेअर करत महिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार सचिनने त्याच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे ज्यामध्ये तो महिला खेळाडूंना क्रिकेट शिकवताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओला १ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
भारतीय फलंदाज मयंक अगरवालने त्याच्यासाठी आदर्श असलेल्या महिलांचा फोटो शेअर करत महिला दिनानिमीत्त सर्वांचे आभार मानले आहेत.
भारतीय खेळाडू चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) देखील सोशल मिडीयावर फोटो शेअर केला आहे. आयपीएल फ्रॅंचायझी राजस्थान राॅयल्स संघाने सोशल मिडीयावर फोटो शेअर करत महिला सशक्तिकरणाचे महत्त्व सांगितले आहे. या फोटोंमध्ये राजस्थान संघाचा खेळाडू संजू सॅमसन सुद्धा दिसत आहे. राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने देखील दोन फोटो शेअर केले आहेत.
https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1501082333172371456
https://twitter.com/rajasthanroyals/status/1501077858483339264
https://twitter.com/mipaltan/status/1501061343427764227
https://twitter.com/ChennaiIPL/status/1501054963803656193
https://twitter.com/SunRisers/status/1501052959819370497
https://twitter.com/KKRiders/status/1501041986618343424
https://twitter.com/RCBTweets/status/1501037489997455368
भारतात अनेक महिला क्रिकेटपटू आहेत ज्यांनी भारतासाठी उत्तम कामगिरी केली आहे, तसेच इतर खेळांमध्ये देखील उत्तम कामगिरी केली आहे.
क्रिकेट हा खेळ नेहमी पुरुषांचा खेळ मानला जातो. परंतु क्रिकेटमध्ये काही स्टार सुद्धा होऊन गेल्या आहेत त्यांपैकीच एक म्हणजे भारतीय फलंदाज मिताली राज. मिताली राज ही ६ विश्वचषक खेळणारी जगातील पहिली महिला ठरली आहे.तसेच झूलन गोस्वामी ही भारतातील महान महिला क्रिकेटपट्टूपैकी एक आहे. गोलंदाजीत तिने कित्येक विक्रम आपल्या नावी केले आहेत. स्म्रीती मंधाना या भारतीय क्रिकेटपटूने आपल्या फलंदाजीने सर्वांना आकर्षित केले आहे. तीने तिच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत २५१३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
दीडशेपेक्षा जास्त धावा कुटल्यानंतर त्याच कसोटीत ८-९ विकेट्सही चटकावणारे अष्टपैलू, जडेजाचाही समावेश
Video: ‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यावर धवन-चहलची धमाल, एनसीएमधील कर्मचाऱ्यांबरोबरही मस्ती
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार खेळाडूंना रोखतोय आयपीएल खेळण्यापासून! म्हणे, ‘हीच तुमची ईमानदारी…’






