कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे योग्य होणार नाही म्हणून सर्व स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत.
आता क्रिकेटचे सामनेही होत नाहीत त्यामुळे क्रिकेटपटूही घरात वेळ घालवत आहेत. त्याबरोबरच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
परंतु अशामध्ये भारताचे माजी फीटनेस ट्रेनर शंकर बासू यांनी खेळाडूंना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. शंकर यांना वाटते की, मोबाईलच्या अतिवापरामुळे खेळाडूंच्या फीटनेसवर परिणाम होऊ शकतो. Mobile abuse can impact players fitness
शंकर (Shankar Basu) यांनी २०१५ ते २०१९ पर्यंत भारतीय संघाचा ट्रेनर म्हणून काम पाहिले होते. शंकर यांनी खेळाडूंना सल्ला देत सांगितली की, मोबाईल, लॅपटॉप आणि टी.व्ही. या गोष्टींचा वापर जमेल तितक्या कमी प्रमाणात करा.
बरेच खेळाडू सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय झाले आहेत. त्याचबरोबर काही खेळाडू टी.व्ही. पाहून आपला वेळ घालवत आहेत.
शंकर यांनी आपले मत मांडत म्हटले की, “दिवसभर झोपून आणि टी.व्ही.चे चॅनेल बदलणे योग्य होणार नाही. यामुळे आपण स्वत: आजाराला आमंत्रण देत असतो. तुम्ही तुमच्या झोपेची वेळ निश्चित करा आणि त्याचप्रकारे दिनचर्या ठरवा. सध्याच्या काळात फलंदाजांचा काही प्रश्न नाही. परंतु गोलंदाजांंना हे महागात पडू शकते. कारण ते आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करतील. परंतु त्यांना आपल्या फीटनेसवर लक्ष देणे कठीण होईल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटपटूंनो, ही असली काम करण्यापेक्षा किराणा मालाची दुकानं सुरु करा
-२५ वर्षांपेक्षा जास्त काळ कसोटी खेळणारे ५ दिग्गज खेळाडू
-टी२० विश्वचषक झाला नाही तर जगातील ५ क्रिकेटपटूंचं करियर जवळपास संपल्यात जमा