वर्ष २०२१ सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. यावर्षी देखील क्रिकेटवर कोरोनाचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. काही खेळाडूंसाठी हे वर्ष खूप चांगले ठरले, तर काही खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर पूर्णपणे फ्लॉप ठरले. तसेच असेही काही खेळाडू आहेत. ज्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्यांचे आयोजन झाले. ज्यामध्ये विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे. तसेच आणखी काही खेळाडू आहेत ज्यांच्या घरी २०२१ वर्षी अपत्याचे आगमन झाले.
१) भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या वर्षाच्या शेवटी पिता झाला आहे. भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नागर यांना २४ नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. यावर्षी क्रिकेटच्या मैदानावर त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. तो सध्या संघाबाहेर आहे. त्यामुळे त्याला आपल्या पत्नी आणि मुली सोबत वेळ जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. (Cricketers who became father in 2021)
२) विराट कोहली (Virat Kohli): भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला याच वर्षाच्या सुरुवातीला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. विराट कोहली आणि बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात ११ जानेवारी २०२१ रोजी वामिकाचे आगमन झाले होते.
३) जोस बटलर (Jos Buttler) : इंग्लंड संघाचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर यावर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी लुईस बटलरने ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. जोस बटलरला यापूर्वी २०१९ मध्ये मुलगी झाली होती. त्याच्या मोठ्या मुलीचे नाव जॉर्जिया रोज आहे. तर दुसऱ्या मुलीचे नाव मॅगी आहे.
४) हरभजन सिंग (Harbhajan Singh) : भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. १० जुलै २०२१ रोजी तो दुसऱ्यांदा पिता झाला होता. याची माहिती त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. त्याची पत्नी गीता बसराने मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव जोवन असे ठेवले आहे.
५) मेगन शट (Megan Schutt) : ऑस्ट्रेलिया संघाची वेगवान गोलंदाज मेगन शट आणि तिची लेस्बिअन पार्टनर यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. मेगन शटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती की, तिची पार्टनर जेसने १७ ऑगस्ट रोजी आपात्कालीन सी – सेक्शनद्वारे मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचे नाव राइल लुईस शट असे आहे.
६) पॅट कमिन्स (Pat Cummins) : ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज आणि कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने आणि पत्नी बेकी बोस्टनने ८ ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला आहे. या मुलाचे नाव एल्बी बोस्टन कमिन्स असे ठेवण्यात आले आहे. पॅट कमिन्सचा हा पहिलाच मुलगा आहे. कोरोना असल्या कारणाने हे दोघेही विवाह बंधनात अडकले नाहीये.
७) ऍरॉन फिंच (Aaron finch) : ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंच देखील यावर्षी पिता झाला आहे. त्याची पत्नी एमी फिंचने मुलीला जन्म दिला आहे. ज्याची माहिती आरोन फिंचने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
८) उमेश यादव (Umesh Yadav) : भारतीय संघाचा स्पीडस्टार उमेश यादव हा देखील यावर्षी पिता झाला आहे. त्याची पत्नी तान्या वाधवाने १ जानेवारी २०२१ रोजी मुलीला जन्म दिला. ज्याची माहिती उमेश यादवने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती.
महत्वाच्या बातम्या –
केवळ विराट-अश्विन नाही, तर ‘या’ भारतीय खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिकेत मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण