वनडे क्रिकेट हे क्रिकेट पिरॅमिडमध्ये मध्यभागी येते. अस्सल क्रिकेट म्हणजेच टेस्ट क्रिकेट अजूनही त्याच्या जागी ठाम आहे. क्रिकेटर्स टिच्चून खेळ करत आपण कसोटी विसरलो नाही हे दाखवून देतात. दुसरीकडे क्रिकेटचा नवा प्रकार टी२० ने सारी समीकरणे बदललीत. टी२० मुळे क्रिकेट हा फक्त बॅटर्स गेम बनून राहिलाय. अगदी ११ व्या नंबर वर बॅटिंगला आलेला बॅटरही लीलया सिक्स मारतोय. याच्या मध्यभागी असलेल्या वनडेत मात्र टेस्ट आणि टी२० यांचा संगम साधावा लागतो. परिस्थितीनुसार खेळावं लागतं. अस असले तरी, वनडेतही बॅटर्स सिक्स फोरची आतिशबाजी करतातच की. मात्र, वनडेत असे काही क्रिकेटर होऊन गेले, ज्यांनी आपल्या देशासाठी भरपूर वनडे मॅचेस खेळल्या, पण त्यांना एक सिक्स मारत आला नाही. आज त्याच पाच क्रिकेटर्सविषयी जाणून घेऊ…
वनडेत सिक्स मारू न शकल्याने सर्वाधिक बदनाम झालेला क्रिकेटर म्हणजे भारताचे मनोज प्रभाकर. मनोज प्रभाकर यांनी अनेक वर्षे टीम इंडियात ऑलराऊंडरची भूमिका पार पाडली. ओपनरपासून नंबर सहापर्यंत बॅटिंग केली. मात्र, १३० वनडेच्या ९८ इनिंग्समध्ये ३००० पेक्षा जास्त बॉल खेळून त्यांना एक सिक्स मारता आला नाही. त्यांनी वनडे करियरमध्ये १८५८ रन्स केल्या. एक सिक्स न मारता सर्वाधिक रन्स केलेले क्रिकेटरही तेच. याची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र ४ सिक्स मारलेले. त्यांच्या संथगती बॅटिंगमुळे त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले.
दोन देशांसाठी खेळलेल्या मोजक्या क्रिकेटर्सपैकी एक असलेले केपलर वेसेल्सही या यादीमध्ये समाविष्ट आहेत. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेसाठी खेळलेल्या वेसेल्स यांचं टेस्ट करियर लाजवाब होतं. मात्र, वनडे करियरमध्ये त्यांना तितके यश मिळाले नाही. त्यांनी एकूण १०९ वनडे खेळल्या. पण साऊथ आफ्रिकेसाठी ५५ वनडे खेळून त्यांना एकही सिक्स ठोकता आला नाही. त्यांचा ५१ चा स्ट्राईक रेट कधीच वनडेसाठी आदर्श मानला गेला नाही.
ऑस्ट्रेलियन मिडल ऑर्डर बॅटर कॅलम फर्ग्युसन हा सध्या टी२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. फर्ग्युसन नेहमीच ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांच्या रडारवर असायचा, पण त्याला फार काळ संघात स्थान राखता आले नाही.
फर्ग्युसनने त्याच्या वनडे करिअरमध्ये ३० मॅचेस खेळल्या. ४१ च्या ऍव्हरेज आणि ८५ च्या स्ट्राईक रेटने रन बनवले. मात्र, त्याला एक सिक्स मारता आला नाही. आज बिग बॅश लीगमध्ये सिक्स फोरचे वादळ आणणाऱ्या फर्ग्युसनबद्दलची ही गोष्ट चक्रावून सोडणारी आहे.
ज्या काळात श्रीलंकन क्रिकेटमध्ये तिलकरत्ने दिल्शान, उपुल थरंगा, कुमार संगकारा व माहेला जयवर्धने असे बॅटर्स होते, त्या काळात मिडल ऑर्डरमध्ये आणखी एक नाव दिसायचे ते म्हणजे थिलन समरवीरा. २०११ वर्ल्डकपमध्ये त्याने शानदार कामगिरी केली होती. श्रीलंकेसाठी ५३ वनडे खेळलेला समरवीरा साडेआठशे रन्स करण्यात यशस्वी ठरला. मात्र, त्याला कधीही बॉल स्टॅंडमध्ये मारता आला नाही.
या यादीतील शेवटचे नाव कोण्या प्रॉपर बॅटरचे नाही. मात्र त्याच करियर लांबलचक होत. ऑल टाईम ग्रेट फास्ट बॉलर असलेला हा क्रिकेटर म्हणजे ग्लेन मॅकग्रा. आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये ९०० पेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या मॅकग्राने २५० वनडे खेळल्या. मात्र, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्याने वनडे करिअरमध्ये फक्त ११५ रन्स केलेत आणि त्यामध्ये एकही सिक्स नाही. २५० वनडे मॅचेस खेळून एकही सिक्स न मारणारा तो एकमेवाद्वितीय. परंतु या मॅकग्राच्या नावावर टेस्टमध्ये एक सिक्स आहे. तोही डॅनियल व्हिटोरीला मारलेला.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्देवाची परिसीमा! एका मॅचच्या पुढे गेले नाही ‘या’ भारतीय क्रिकेटर्सचे इंटरनॅशनल करिअर
रिटायरमेंटनंतर दोन देशांच्या क्रिकेटर्समध्ये मैत्री असते का?
गांगुलीने नुसती दादागिरीच नाही केली, तर ‘हे ५ कोहिनूर हिरे’ दिले टीम इंडियाला