बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग हा १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार असून, या चित्रपटात भारताचा विश्वचषक १९८३ मधील प्रवास दाखवण्यात येणार आहे. भारताने अंतिम सामन्यात बलाढ्य विंडीज संघाला कश्याप्रकारे मात दिली आणि आपला पहिला वाहिला विश्वचषक जिंकला या अविस्मरणीय प्रवासात हा चित्रपट आपल्या सर्वाना नेणार आहे.
या चित्रपटाचे निर्माते फॅंटम फिल्म्स असणार आहे, ज्यात चित्रपट निर्माते अनुराग कश्यप, विकास बहल, विक्रमादित्य मोटवणे आणि मधू मांतानाने हे सह-मालक आहेत. कबीर खानने याआधीच सांगितले होती की, रणवीर हा कपिल देवाच्या भूमिकेसाठी पहिला पर्याय असेल.
” एक यूवा म्हणून मी जेव्हा भारताला लॉर्ड्समध्ये विश्वचषक जिंकताना पाहिले. तेव्हा मला असे वाटले नव्हते की यामुळे देशातील क्रिकेटला एवढी मोठी वळण मिळेल. एक चित्रपट निर्माता म्हणून माझ्यासाठी तो विजयी प्रवास, ते ऊर्जीने भरलेला तरुण आणि अभिमानास्पद कामगिरी ही कदाचित मी काम केलेली सर्वात रोमांचक कथांपैकी एक आहे. रणवीर कपिल देवची भूमिका करण्यासाठी अगदी बरोबर आहे, त्यामुळे मी या भूमिकेत खरोखरच इतर कोणाला पाहू शकणार नाही.”
भारतीय क्रिकेटपटुंवर बॉलिवूडने चित्रपट बनवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, २०११ चा विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर यांच्यावर चित्रपट बनवण्यात आले आहे. झूलन गोस्वामीच्या जीवनावरही एक चित्रपट बनवण्यात येणार आहे.