---Advertisement---

फॅब-4 आणि शतक: विराट, स्मिथ, रूट यांच्या प्रतीक्षेची कहाणी

On: सोमवार, फेब्रुवारी 10, 2025 10:54 PM
---Advertisement---

गेल्या दीड दशकात क्रिकेट जगतात चार महान फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. ते चार फलंदाज म्हणजे जो रूट, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली. या चौघांनी सातत्याने आपल्या अप्रतिम खेळाने क्रिकेटविश्व गाजवले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत केन विल्यमसनने आपल्या 21 डावांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत एकदिवसीय क्रिकेटमध्ये शानदार शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने नाबाद 133 धावा करून संघाला विजयाकडे नेले. मात्र,फॅब-4 मधील उर्वरित तीन सदस्य विराट कोहली, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ अद्यापही एकदिवसीय शतकाच्या प्रतीक्षेत आहेत.

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या 453 दिवसांपासून त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये एकही शतक केलेले नाही. याचे एक मुख्य कारण म्हणजे 2024 मध्ये भारतीय संघाने फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले. विराटचे शेवटचे आणि 50 वे एकदिवसीय शतक 2023 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झाले, जिथे त्याने 117 धावा केल्या.

स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या आठ कसोटी सामन्यांपैकी चार डावांमध्ये त्याने शतके झळकावली आहेत. पण एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या शतकाची वाट 883 दिवसांपासून पाहत आहे. स्मिथने शेवटचे एकदिवसीय शतक सप्टेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केले होते, जिथे त्याने 105 धावा केल्या होत्या. स्मिथने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 शतके केली आहेत.

जो रूट 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या शतकाची प्रतीक्षा एक-दोन वर्षांची नाही, तर पाच वर्षांची आहे. रूटने गेल्या चार वर्षांत 19 कसोटी शतकांची नोंद केली आहे, परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक करण्यासाठी त्याला 2068 दिवसांची प्रतीक्षा करावी लागली आहे. रूटचे शेवटचे शतक जून 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात झाले होते.

हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी जसप्रीत बुमराहच्या सहभागावर अनिश्‍चितता, अंतिम निर्णय लवकरच
रोहित शर्माचा संयम सुटला, भर मैदानात डीजेवाल्याला झापलं, VIDEO
चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार पाकिस्तान? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---