फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी झालेला पोर्तूगाल वि. स्पेन सामना 3-3 आशा बरोबरीत सुटला.
या सामन्यात पोर्तूगालच्या ख्रितियानो रोनल्डोने फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील 51 वी हॅट्रीक आपल्या नावे नोंदविली. तसेच 2018 फिफा विश्वचषकातीली ही पहिली हॅट्रीक आहे. योगायोग म्हणजे त्याच्या क्लब आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सुद्धा ही 51 वी हॅट्रीक ठरली.
त्याचबरोबर 33 वर्षीय रोनाल्डो फिफा विश्वचषकात हॅट्रीक नोंदवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
साऱ्या फुटबॉल विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या हा ‘ब’ गटातील तगड्या पोर्तूगाल वि. स्पेन सामना अत्यंत अटातटीचा झाला. 3-2 असे पिछाडीवर पडलेल्या पोर्तूगालला शेवटच्या क्षणी ख्रितियानो रोनल्डोने 87 व्या मिनिटाला फ्री किकवर गोल करत बरोबरीत आणले.
महत्त्वाच्या बातम्या:
–फुटबाॅलप्रेमापोटी क्रिकेटर रोहित शर्मा पत्नी रितीकासह थेट रशियाला
–टाॅप ५- फिफा विश्वचषक आणि क्रिकेट विश्वचषकातील हे आहेत ५ मोठे फरक