जगातील काही मोजक्या दिग्गज फुटबाॅलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्टियानो रोनाल्डोचे लवकरच मँचेस्टर युनायटेडमध्ये पुनरागमन होत आहे. गेले काही हंगाम यूवेंटेससाठी खेळणारा रोनाल्डो आता लवकरच मँचेस्टर युनायटेडसाठी खेळताना दिसेल. स्वत: मँचेस्टर युनायटेडने या गोष्टीची पुष्टी केली आहे.
यापूर्वीही रोनाल्डो मँचेस्टरसाठी खेळला आहे, पण त्यानंतर तो रियाल मद्रिदसोबत जोडला गेला. स्पॅनिश लीगनंरत रोनाल्डोने इटॅलियन फुटबाॅल क्लब यूवेंटेससोबत करार केला. मात्र, तो आता पुन्हा एकदा तो इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसेल.
इंग्लंड आणि इटॅलियन माध्यामांच्या माहितीप्रमाणे रोनाल्डोला मँचेस्टर युनायटेडने २५ मिलियन यूरो म्हणजेच भारतीय चलनानुसार २१६ कोटी रुपयांनांपेक्षा जास्त रक्कम देऊन विकत घेतले आहे. रोनाल्डोने मँचेस्टर यूनाइटेडसाठी ६ ईपीएल सीजन खेळले आहेत आणि त्याने क्लबला ८ मोठी विजेतीपदं जिंकवून दिली आहेत. त्याचसोबत तो याकाळात बॅलेन डी ओरही जिंकला आहे. मँचेस्टर यूनाइटेडव्यतिरिक्त मँचेस्टर सिटीही रोनाल्डोला विकत घेणार होती, पण शेवटी युनायटेडने बाजी मारली.
रोनाल्डो मोठे नुकसान होत असतानाही यूवेंटरमधून मँचेस्टर यूनाइटेड क्लबमध्ये येत आहे. माध्यामांच्या माहितीप्रमाणे तो यूवेंटस क्लबकडून प्रति हंगामासाठी १०० मिलियन डाॅलर्स म्हणजे ७३४ करोड रुपये घेत होता. मात्र, आता मँचेस्टर युनायटेड क्लबकडून त्याला २१६ करोड रूपये प्रति हंगामाला मिळणार आहेत.
मॅनचेस्टर युनायटेडने त्यांच्या आधिकारीक वेबसाइटवर रोनाल्डोबाबत पुष्टी केली आहे. क्लबने माहिती दिली की, “मँचेस्टर युनायटेडला तुम्हा लोकांनी हे सांगताना खूप आनंद होत आहे की, ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या ट्रान्सपरवर यूवेंटेसशी करार झालेला आहे.”
मँचेस्टर यूनाइटेडने पुढे लिहिले आहे, “ख्रिस्टियानो रोनाल्डोने क्लबसाठी २९२ सामन्यांमध्ये ११८ गोल केले आहेत. तो पाच वेळा बॅलेन डी ओर जिंकला आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत ३० पेक्षा जास्त ट्राॅफी जिंकल्या आहेत, जामध्ये यूएफा चॅम्पियन लीग टायटल, चार फिफा क्लब विश्वचषक आणि इंग्लंड, स्पेन आणि इटलीमध्ये ७ ट्रॉफी आहेत. तो पुर्तगालसाठी युरोपियन चॅम्पियनशिपही जिंकला आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘तू महान खेळाडू झालास’, ज्याचा विक्रम मागे टाकला त्यानेच रुटचा लहानपणीचा फोटो केला शेअर
‘अँडरसनने शिकवलेल्या वॉबल ग्रिपचा वापर सामन्यात केला अन् त्याचा फायदाही झाला’, रॉबिन्सनचा खुलासा
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी वेळापत्रात बदल; ‘इथे’ आणि ‘या’ दिवसापासून होणार सामने