क्रोएशियाचा फुटबॉलपटू निकोला कॅलिनीचने फिफा विश्वचषकाचे रौप्यपदक घेण्यास नकार दिला आहे. कारण त्याला स्पर्धा संपण्यापूर्वीच मायदेशी परत पाठवण्यात आले होते.
पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचलेल्या क्रोएशियाला फ्रान्सकडून 4-2ने पराभूत होऊन रौप्यपदावर समाधान मानावे लागले होते.
कॅलिनीचला नायजेरिया विरुद्धचा सामना झाल्यावर संघातून कमी केले होते. क्रोएशियाचा या स्पर्धेतील हा पहिलाच सामना होता. यात त्यांनी नायजेरियाला 2-0ने पराभूत केले.
पदक घेण्यास नकार देताना कॅलिनीच म्हणाला, “मी संघाचा खूप आभारी आहे. पण रशियात झालेल्या सामन्यांमध्ये मी खेळलोच नाही.”
क्रोएशियाचे प्रशिक्षक झ्लाटोक डेलिच यांनी कॅलिनीचला त्याच्या पाठदुखीमुळे घरी पाठवले होते.
याविषयी अधिक माहिती देताना डेलिच म्हणाले, “मी त्याला नायजेरिया विरुद्धच्या सामन्यात 85व्या मिनीटाला खेळण्यास बोलवले होते. पण कॅलिनीचने येण्यास नकार दिला.”
“तसेच त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या ब्राझिल विरुद्धच्या मैत्रीपुर्व सामन्यात खेळण्यासही नकारत्मकता दर्शवली होती. सरावाच्या वेळीही तो गैरहजर होता,” असे डेलिच पुढे म्हणाले.
क्रोएशियाच्या संघात त्याच्याजागी कोणालाच घेतले नव्हते. त्यामुळे ते फक्त 22 खेळांडूसह स्पर्धेत खेळत होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–थाई गुहेतून वाचलेल्या मुलांसाठी क्रोएशियाने पाठवली संघाची जर्सी
–ब्राझिलचा हा फुटबॉलपटू ठरला जगातील महागडा गोलकिपर