पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमध्ये निम्म्यापेक्षा सर्वाधिक संघ इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रॅंचायजींनी विकत घेतले आहेत. यामुळे या लीगला मिनी आयपीएल देखील म्हटले जात आहे. या लीगमध्ये मुंबई पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) नवी फ्रॅंचायजीने विकत घेतली आहे. त्या संघाला जोहान्सबर्ग सुपर किंग्जदेखील म्हटले जाऊ शकते. या संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग तर मेंटर म्हणून एमएस धोनी असण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) परवाणगी घेणे आवश्यक आहे.
सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले, “या संघात कोण खेळणार ती नावे लवकरच जाहीर केली जातील. प्रशिक्षकाबाबत आम्ही स्टीफनशी बोलत आहेत. सीएसकेचा वारसा पुढे चालू राहण्यासाठी स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) व्यतिरिक्त कोणचाच विचार डोक्यात येऊ शकणार नाही.”
“धोनीची या संघातील उपस्थिती बीसीसीआयच्या मंजूरीवर अवलंबून आहे. तो खेळणार नाही, मात्र बीसीसीआयने परवाणगी दिली तर तो संघात कोणतीही भुमिका बजावू शकतो,” असेही त्यांनी धोनीबाबत म्हटले आहे.
या लीगमध्ये सीएसके व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपरजायंट्स या फ्रॅचायजींनीही संघ विकत घेतले आहेत. तर चेन्नईने जोहान्सबर्ग फ्रॅचायजींला सर्वोच्च बोली लावत विकत घेतले.
सीएसकेनंतर आता जेएसके!
मुंबईने केपटाऊन फ्रॅंचायजी विकत घेतली असून त्याचे नाव एमआय केपटाऊन असे आहे. तर माध्यमातील वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स आपल्या दक्षिण आफ्रिका टी२० लीगमधील संघाचे नामकरण ‘जो’बर्ग सुपर किंग्स’ असे करणार असल्याचे म्हटले जात आहे.
पुन्हा एकदा फाफ सुपर किंग्समध्ये
माध्यमातील माहितीनुसार, चेन्नईच्या मालकीच्या जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजीने फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) व मोईन अली या आयपीएलमधील आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. फाफ सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजर्सं बेंगलोरचा (आरसीबी) भाग बनला होता. त्याने २०१४, २०१५ आणि २०१८ ते २०२१ हे हंगाम सीएसकेकडून खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या या टी२० लीगसाठी पुढील महिन्यात खेळाडूंचा लिलाव पार पडू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup| ‘रोहित आणि टीम’ला द्यावी लागणार फिटनेस टेस्ट, ‘या’ दिवशी दुबईसाठी भरतील उड्डाण
फिरकीपटूंसाठी मोठी बाधा आहे ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू, आशिया चषकात संधी देण्याची होतीये मागणी
व्वा पांडेजी! भारतीय संघातून बाहेर असलेल्या मनिषचा टी२० लीगमध्ये कहर, ठोकले झंझावाती अर्धशतक