---Advertisement---

नव्या टी20 लीगबद्दल डी कॉक झालाय भलताच खुश, दिली ‘ही’ प्रतिक्रिया

On: शुक्रवार, नोव्हेंबर 25, 2022 11:01 PM
Quinton De kock
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत एका नव्या टी20 स्पर्धेला सुरुवात होत आहेे. या स्पर्धेत बरेच संघ खेळताना दिसतील आणि जगभरातील खेळाडू भाग घेणार आहेत. दिग्गज यष्टीकक्षक फंलदाज क्विंटन डी कॉक या स्पर्धेबद्दल खुप उत्साही आहे. त्याने म्हटलय की तो या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय.

सीएसए टी20 चॅलेंज या स्पर्धेची सुरुवात 10 जानेवारी 2023 पासून होणार आहे आणि या स्पर्धेचा अंतिम सामना 11 फेब्रुवारीला खेळला जाईल. या स्पर्धेमध्ये एका आठवड्याचा ब्रेक देखील असणार आहे, या दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघामध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. आयपीएलच्या 6 फ्रेंचाइझी संघ, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने केपटाउनला, चेन्नई सुपर किंग्जने जोहान्सबर्ग सुपर किंग्जला, दिल्ली कॅपिटल्सने प्रिटोरिया कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्सने डर्बन सुपरजायंट्स संघ खरेदी केले आहे.

या स्पर्धेसाठी आम्ही खुप उत्साही आहोत- क्विंटन डी कॉक
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी20 लीग संदर्भात क्विंटन डी कॉक याने एका मुलाखतीत या स्पर्धेबद्दल प्रतिक्रिया दिली. ज्यात त्याने म्हटलय की,”ही एक नवी स्पर्धा आहे आणि यामुळे अपेक्षाही जास्त आहेत. माझ्यामते हा दक्षिण आफ्रिकेतील एका मोठ्या कार्यक्रमांमधील एक असणार आहे. खुप सारे युवा खेळाडू ज्यांना मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही, ते खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. यामुळे युवा खेळाडूंना याचा फायदा होईल. आमच्यासाठी देखील ही नवी सुरुवात आहे. मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय.”

या स्पर्धेत 33 सामनेे आयोजित करण्यात येणार आहेत, ज्याचा अंतिम सामना जोहान्सबर्ग येथील ऐतिहासिक मैदान ‘द वंडरर्स’ येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेत पुन्हा खेळवल्या जाणाऱ्या या मोठ्या टी20 लीगचा पहिला हंगाम देशभरात 6 ठिकाणी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचे मालकी हक्क आणि स्पर्धेचे स्वरुप आयपीएलसारखेच असणार आहेे.(CSA T20 league will be organized same as IPL and IPL franchises has brough six teams)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! विश्वचषकाला मुकलेला बुमराह लवकरच करतोय पुनरागमन, सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल
‘त्यामुळे’ भारत विश्वचषक जिंकत नाहीये! रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---