---Advertisement---

IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर

On: सोमवार, नोव्हेंबर 2, 2020 1:17 PM
---Advertisement---

आयपीएल 2020 मध्ये एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्यांचे 14 सामने पूर्ण खेळले आहेत. यामध्ये त्यांना 6 सामन्यांत विजय मिळवता आला तर 8 सामने त्यांना गमवावे लागले. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईच्या संघाला ‘प्ले ऑफ’ बाहेर रहावे लागले आहे.

त्यामुळे चेन्नईच्या निराशाजनक कामगिरी नंतर संघाने काय बदल करावे ? यावर अनेक क्रिकेट तज्ञांनी स्वतःच्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच मागील काही धोनीच्या प्रतिक्रियांनुसार कदाचीत पुढील हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघात अनेक बदल होऊ शकतात. या हंगामातील ढिसाळ कामगिरी नंतर कदाचित चेन्नईचा संघ काही खेळाडूंना काढू शकतो.

पुढील हंगामासाठी या पाच खेळाडूंना चेन्नई करू शकतात बाहेर

1. इम्रान ताहीर

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर याने या हंगामात 3 सामन्यांत गोलंदाजी केली. परंतु त्याला फक्त एकच बळी घेण्यात यश आले. ताहीरचे वय देखील 41 झाले असून त्याचा खेळ देखील समाधानकारक दिसत नाही. त्यामुळे चेन्नईचा संघ त्याला पुढील हंगामात ठेवेल अशी शक्यता फारच कमी आहे.

2. शेन वॉटसन

शेन वॉटसन हा तो खेळाडू आहे, ज्याने चेन्नईला धुव्वादार फलंदाजी करून 2018 ची आयपीएलचे विजेतेपद जिंकवून दिले होते. एकेकाळी त्याच्या जोरावर चेन्नई मोठमोठे आकडे उभी करत होती. परंतु या हंगामात वॉटसन काही खास करू शकला नाही. त्याने खेळलेल्या 11 सामन्यांत तो 299 धावा करू शकला. त्याचे वय देखील पुढील हंगामात 40 होत असल्याने त्याच्या खेळाकडे पाहून त्याला चेन्नई संघात ठेवण्याची शक्यता आहे.

3. मुरली विजय

मुरली विजय अनेक वर्षांपासून चेन्नईच्या संघाचा एक भाग बनून आहे. हंगामातील पहिल्या तीन सामन्यांत त्याला संधी दिली गेली. ज्यात तो जेमतेम 32 धावाच करू शकला. विजयचे वय देखील 37 च्या घरात असल्याने आणि त्याचा खराब झालेला खेळ पाहून चेन्नई त्याला पुन्हा संघात स्थान देईन, असेही वाटत नाही.

4. पियुष चावला

फिरकीपटू पियुष चावलाला चेन्नईने 6.75 कोटी रुपयांना संघात घेतले होते. वयाने तोही ज्येष्ठ असून फारशी उत्तम कामगिरी तो करू शकला नाही. त्याच्या गोलंदाजीवर अनेक फलंदाज तुटून पडल्याचे देखील पहायला मिळाले. त्यामुळे भविष्याचा विचार करुन त्यालाही चेन्नई संघ बाहेरचा रस्ता दाखवू शकतात.

5. केदार जाधव

यंदाच्या हंगामात चेन्नई संघाला सर्वाधिक कोणी निराश केले असेल तर तो केदार जाधव आहे. संघाला गरज असताना अष्टपैलू कामगिरी करणारा केदार जाधवने यंदा अत्यंत खराब खेळ केला. चेन्नईकडून खेळताना या हंगामात त्याने गोलंदाजी न करता केवळ फलंदाजी केली. त्यातही तो खास काही करु शकला नाही. त्यामुळे पुढील हंगामात त्याला कदाचित संघ बाहेर करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2020: प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी कोहलीच्या RCB संघापुढे असेल ‘विराट’ आव्हान

पंचाच्या ‘त्या’ एका चुकीच्या निर्णयामुळे आमची आयपीएल ट्रॉफी हुकली, केएल राहुलचे मोठे वक्तव्य 

जर असे झाले तरच कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफसाठी ठरणार पात्र, असे आहे समीकरण

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

…आणि रोहितचा रो’हिट’ झाला!

एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---