---Advertisement---

दिवंगत क्रिकेटर सायमंड्सला चेन्नई आणि गुजरातच्या खेळाडूंनी ‘अशी’ वाहिली श्रद्धांजली

On: रविवार, मे 15, 2022 7:23 PM
Moeen-Ali-Hardik-Pandya
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू एँड्र्यू सायमंड्स याचा शनिवारी (१४ मे) कार अपघातात मृत्यू झाला आहे. तो ४६ वर्षांचा होता. या धक्कादायक वृत्तानंतर क्रिकेटविश्व शोकसागरात बुडाले आहे. वर्षभरात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने दिग्गज क्रिकेटपटूला गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. सायमंड्सपूर्वी रॉड मार्श आणि शेन वॉर्न या ऑस्ट्रेलियन दिग्गजांचे निधन झाले आहे.

सायमंड्सच्या (Andrew Symonds Death) आकस्मिक निधनानंतर त्याला क्रिकेटचाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. रविवारी (१५ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) संघातील सामन्यातूनही त्याला श्रद्धांजली वाहिली गेली. चेन्नई आणि गुजरात संघाचे खेळाडू सायमंड्सच्या स्मरणार्थ आपल्या हाताच्या दंडावर काळी पट्टी बांधून (Black Armband) मैदानावर उतरले होते. 

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १३३ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात गुजरातने ५ चेंडू शिल्लक ठेवून ३ विकेट्सच्या नुकसानावर चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले आणि ७ विकेट्सने सामना जिंकला. हा गुजरातचा हंगामातील दहावा विजय होता.

चेन्नईच्या १३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून सलामीवीर वृद्धिमान साहा याने सर्वाधिक ६७ धावा चोपल्या. सलामीला फलंदाजीला येत त्याने डावाखेर नाबाद राहात ही मॅच विनिंग खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५७ चेंडू खेळले आणि १ षटकार व ८ चौकारही मारले. त्याच्याखेरीज डेविड मिलरने डावाच्या शेवटी नाबाद १८ धावांच्या खेळीचे योगदान दिले. तसेच मॅथ्यू वेड (२० धावा) आणि शुबमन गिल (१८ धावा) यांनीही उपयुक्त खेळी केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या मात्र या सामन्यात ७ धावांवरच बाद झाला.

या डावात चेन्नईच्या गोलंदाजांची चांगले प्रयत्न केले. मथिशा पथिरानाने पदार्पणाचा सामना खेळताना प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ३.१ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत २ विकेट्स चटकावल्या. तसेच मोईन अलीला १ विकेट्स मिळाली.

तत्पूर्वी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर केवळ १३३ धावा केल्या. चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक ५३ धावा फटकावल्या. मात्र आपले अर्धशतक करण्यासाठी त्याने ४९ चेंडू खेळले आणि १ षटकार व ४ चौकारही मारले. हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील दहावे अर्धशतक होते. ऋतुराजव्यतिरिक्त एन जगदीशन यानेही नाबाद ३९ धावा जोडल्या. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी या सामन्यात केवळ ७ धावा करून बाद झाला.

या डावात गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि साई किशोर यांच्या पदरीही प्रत्येकी एक विकेट आली.

महत्त्वाच्या बातम्या-

बॅटवर स्टिकर लावण्याचे क्रिकेटर्सला किती पैसे मिळतात? जाणून घ्या भारताच्या स्टार खेळाडूंबद्दल

तीन युवा भारतीय खेळाडू, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत मिळू शकते संधी

एँड्र्यू सायमंड्सने क्रिकेटमध्ये कमावला होता अफाट पैसा, कुटुंबासाठी मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---