आयपीएल 2023चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झाला. सीएसकेने या सामन्यात 27 धावांनी विजय मिळवला. मागच्या वर्षी सीएसकेचे कर्णधारपद मिळाल्यानंतर जडेजाने काहीच सामन्यांनंतर ही जबाबदारी सोडली होती. याच पार्श्वभूमीवर एमएस धोनी, सीएसके आणि जडेजा यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे बोलले जात होते. आता रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट लाईक केली आहे, ज्यामुळे या चर्चा पुन्हा होऊ लागल्या आहेत.
बुधवारी (11 मे) सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मिळवलेल्या विजयात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे योगदान महत्वाचे होते. जडेजाने फलंदाजीत 16 चेंडूत 21 धावा केल्या. गोलंदाजीत चार षटकात 19 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. सीएसकेचा सामना असेल आणि चाहते धोनीची फलंदाजीसाठी वाट पाहत नसतील, असे कधीच होत नाही. या सामन्यातील जडेजा खेळत असताना चाहते धोनीचा वाट पाहताना दिसले. सामना संपल्यानंतर जडेजानेही मजेशीर अंदाजात मी खेळताना चाहते धोनीची वाट पाहत होते, असे बोलून दाखवले. पण एका नेटकऱ्याच्या मते जडेजाने ही गोष्टी मजेत बोलली असली, तरी त्याच्या मनात याविषयी खंत आहे. जडेजाने स्वतः या चाहत्यांची पोस्ट लाईक केल्यामुळे सीएसके आणि जडेजा यांच्यातील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेतत.
सोशल मीडियावरची कोणती पोस्ट जडेजाने लाईक केली?
या नेटकऱ्याच्या मते जडेजा दाखवत नसला, तरी तो आतून नाराज आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “जडेजाने ही गोष्ट हसत बोलली असली, तरी त्याच्या मनात याविषयी खूल दुःख आहे. माझा विश्वास ठेवा हे एखाद्या सदम्यापेक्षा कमी नाहीये. तुमच्या संघाचे चाहते तुम्हालाच समर्थन देत नसतील तेव्हा हा अनुभव कसा असेल, जरा विचार करा. तीन सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतरही तुमच्यावर टीका होत आहे.” जडेजाने स्वतः डॉ. राजकुमार नावाच्या या नेटकऱ्याची ही पोस्ट लाईक केली आहे.
चाहते मी बाद होण्याची वाट पाहतील!
दरम्यान, दिल्लीकडून मिळालेल्या पराभवानंतर जडेजा म्हणाला की, “जर फलंदाजी करण्यासठी लवकर आलो, तर चाहते माही.. माही.. ओरडतील. चाहत्यांकडून धोनी लवकर फलंदाजीला यावा अशा प्रार्थना केल्या जातील. त्यांचकडून मी बाद होण्याची वाट पाहिली जाईल,” असे जडेजा हसत हसत म्हणाला होता.
सीएसके आणि जडेजातील नेमका वाद काय?
दरम्यान, मागच्या वर्षीचा आयपीएल हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी एमएस धोनी याने संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. असात संघाचा नवीन कर्णधार म्हणून रविंद्र जडेजाची निवड केली गेली. पण या हंगामातील पूर्वार्धात जडेजाच्या नेतृत्वातील सीएसके संघ खूपच निराशाजनक प्रदर्शन करताना दिसला. अशात जडेजाने स्वतःहून संघाचे कर्णधारपद सोडल्याचे बोलले गेले आणि सीएसकेचे कर्णधारपद पुन्हा एमएस धोनीकडे आले. याच पार्श्वभूमीवर सीएसके संघ व्यवस्थापन, जडेजा आणि धोनी यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा झाल्या होत्या. (CSK and Ravindra Jadeja’s rift is back in the limelight, ‘this’ post was liked by jadeja)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ पाच संघ नाही सहन करू शकणार अजून एक पराभव, आयपीएलमधून बाहेर होण्याच्या मार्गावर
अनुष्कासाठी चुकीचा शब्द वापरणाऱ्या पॅपराजीला विराटचे मजेशीर उत्तर, व्हिडिओ तुफान व्हायरल