इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) (Indian Premier League) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ एक ब्रँड म्हणून जगासमोर येत असतात. काही महिन्यांपूर्वी लखनऊ संघ खरेदी करण्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या आस पास बोली लावण्यात आली होती. यावरूनच अंदाज लावला जाऊ शकतो की, ही स्पर्धा किती लोकप्रिय स्पर्धा आहे. आता या स्पर्धेतील आणखी २ संघांनी जागतिक स्तरावर मोठा किर्तीमान केला आहे.
सध्या सोशल मीडियावर सर्व संघांचे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट असतात. ज्यावर ते संघातील खेळाडूंचे फोटो शेअर करत असतात तसेच अपडेट देत असतात. या संघांना लाखो लोक फॉलो देखील करत असतात. नुकताच एमएस धोनी (Ms Dhoni) कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली ८ वर्षे खेळलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal challengers Bangalore) संघाने सोशल मीडियावर मोठा कारनामा केला आहे.
या दोन्ही संघांनी २०२१ मध्ये सोशल मीडियावरील लोकप्रियतेच्या बाबतीत जगातील टॉप-१० संघांमध्ये स्थान मिळवले आहे. मुख्य बाब म्हणजे क्रिकेट विश्वातील केवळ हे २ संघ आहेत, ज्यांना टॉप-१० मध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. तसेच रोहित शर्माचा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ या यादीत स्थान मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघापासून काही पाऊल दूर आहे.
अधिक वाचा – आयपीएलला मिळाला नवा स्पॉन्सर! टाटांच्या नावाने ओळखली जाणार सर्वात मोठी टी२० लीग
गेल्या वर्षी १ जानेवारीपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत ८२० मिलियन (८२ कोटी) एंगेजमेंटसह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ८ व्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघ ७५२ मिलियन (७५.२ कोटी) एंगेजमेंटसह ९ व्या स्थानी आहे. मँचेस्टर युनायटेड (Manchester United) २.६ बिलियन एंगेजमेंटसह पहिल्या स्थानावर आहे. स्पॅनिश फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोना (FC Barcelona) , रिअल माद्रिद (Real Madrid), लिओनेल मेस्सीचा फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मेन आणि चेल्सी एफसी या संघांचा सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय संघांमध्ये टॉप -५ मध्ये समावेश आहे.
व्हिडिओ पाहा – वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता
आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू असताना एप्रिल महिन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सर्वात जास्त एंगेजमेंट मिळवणारा संघ होता. या महिन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची एंगेजमेंट २६.५ कोटी इतकी होती. त्यावेळी एफसी बार्सिलोनाची इंगेजमेंट २४.४ कोटी इतकी होती. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाची एंगेजमेंट या काळात २०.५ कोटी इतकी होती.
महत्वाच्या बातम्या:
बापरे! रस्त्यावर चणे विकतोय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा: