येत्या एप्रिल महिन्यात इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशातच प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल हे जवळपास नक्की. दरम्यान दुबईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आनंदाची बातमी आहे. नुकत्याच २० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत २ दिवसात चेन्नई संघात समावेश असलेल्या ३ खेळाडूंनी शतक झळकावले आहे.
मागच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाला फलंदाजांच्या अपयशामुळे ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई संघाला प्ले ऑफ गाठण्यास अपयश आले होते. आयपीएल २०२१ साठी चेन्नई संघात असलेल्या रॉबिन उथप्पा, नारायण जगदिशन तसेच मागील आयपीएल हंगामात एकापाठोपाठ ३ अर्धशतकीय खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड या तिन्ही खेळाडूंनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक झळकावले आहे.
महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची शतकीय खेळी केली. या खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाला हिमाचल प्रदेशविरुद्ध ८ बाद २९५ धावा करता आल्या. तसेच नुकताच चेन्नई सुपर किंग्स संघात निवड झालेल्या रॉबिन उथप्पाने देखील केरळ संघाकडून खेळताना ओडीसाविरुद्ध १० चौकार आणि ४ षटकारांचा मदतीने १०७ धावा केल्या. तर दुसरीकडे नारायण जगदिशनने तमिळनाडूकडून पंजाब संघाविरुद्ध ताबडतोड १०१ धावांची खेळी केली.
आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्स संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार) , सुरेश रैना, अंबाती रायडु, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डू प्लेसिस, इम्रान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड़, शार्दुल ठाकुर, सॅम करेन, कृष्णप्पा गौतम, जोश हेजलवुड, आर साई किशोर, रॉबिन उथप्पा, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, एम हरिशंकर रेड्डी, के भागनाथ वर्मा आणि सी हरि निशांत.
महत्त्वाच्या बातम्या –
तेवतिया ऑन फायर!! एकदिवसापूर्वीच टीम इंडियात निवड झालेल्या राहुलची ६ षटकारासह ताबडतोड खेळी
आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर फिंचची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला माहित होते…’
रसेल, पूरनसह ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू गेलच्या ड्रीम टीममध्ये, सांगितले समावेशाचे कारण