रविवारी (दि. 14 मे) डबल हेडरचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात 7.30 वाजता खेळला गेला. हंगामातील घरच्या मैदानावरील आपला अखेरचा सामना खेळत असलेल्या चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, केकेआरच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत चेन्नईला रोखण्याचे काम केले. त्यावेळी चेन्नईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला पुन्हा एकदा अपयश आले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याच्या कामगिरीत कमालीची घसरण दिसून आली.
ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर रहाणेला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, केवळ 1 षटकार व 1 चौकार मारत तो 11 चेंडूवर 16 धावा करत बाद झाला.
या आयपीएलआधी झालेल्या लिलावात अजिंक्य रहाणे याला चेन्नईने केवळ पन्नास लाखांच्या किमतीत आपल्या संघात सामील करून घेतलेले. तत्पूर्वी, मागील जवळपास दीड वर्षांपासून तो भारतीय संघाचा भाग नाही. हंगामातील पहिल्या दोन सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. मात्र, संधी मिळाल्यानंतर त्याने पहिल्याच सामन्यात मुंबईविरुद्ध वादळी अर्धशतक झळकावले. त्यानंतर केकेआरविरुद्धही त्याची अशीच एक आक्रमक खेळी आली. राजस्थानविरुद्ध देखील त्याच्या बॅटमधून धावा आल्या.
त्याचा फॉर्म पाहता त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. भारतीय संघात निवड होण्याआधी त्याने आयपीएल 2023 मध्ये 52.25 च्या सरासरीने व 199 च्या स्ट्राईक रेटने 178 धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय संघात निवड झाल्यापासून तो एकाही सामन्यात 21 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्याची सरासरी 19 पर्यंत घसरली असून, स्ट्राईक 114 इतका खाली आला आहे इतका खाली आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतेय.
(CSK Batter Ajinkya Rahane Form Deep In IPL 2023 After WTC Final Selection)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
IPLची एकही ट्रॉफी न जिंकणाऱ्या RCBचा भीमपराक्रम! राजस्थानला हरवत नोंदवला खास विक्रम, चेन्नई मागेच
भारतीय दिग्गजाची संघातून केलेली हाकालपट्टी, ब्लॅकमेल करून साधला फायदा; मैदानावर परतताच ठोकलं द्विशतक