मंगळवारी (दि. 30 मे) आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा धक्का दिला. यासह सीएसके संघाच्या नावावर पाचवी आयपीएल ट्रॉफी झाली. एमएस धोनी याच्या नेतृत्वात सीएसकेने 5 किताब आपल्या नावावर केले आहेत. यासह त्यांनी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या 5 वेळा ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. हा हंगाम धोनीसाठी खूपच खास राहिला, त्याला प्रत्येक विरोधी संघाच्या मैदानावर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. मात्र, यादरम्यान तो गुडघ्याच्या दुखापतीने चिंताग्रस्तही दिसला. अशात आता धोनीविषयी मोठी बातमी समोर येत आहे. धोनीवर मुंबईच्या एका मोठ्या रुग्णालयात गुडघ्याची सर्जरी पार पडली.
कुठे होणार सर्जरी?
मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन संस्था येथे एमएस धोनी (MS Dhoni) याच्यावर उपचार आले. गुरुवारी (दि. 1 जून) प्रख्यात डॉ. दिनशॉ परडीवाला (dr dinshaw pardiwala) यांनी धोनीची सर्जरी केली.
चेन्नई सुपर किंग्स संघाचे सीईओ काशी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “तो डॉ. परडीवाला यांना भेटण्यासाठी गेला आहे आणि पुढील हंगामासाठी पूर्ण ठीक होण्यासाठी सर्जरीचा मार्ग अवलंबण्यासाठी सज्ज आहे.”
परडीवालांनी केलेली पंतची सर्जरी
मुंबईला जाण्यापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ व्यवस्थापनाशी आपली दुखापत आणि सर्जरीबद्दल विचारविनिमय केला. त्यानंतर फ्रँचायझीने संघाचे फिजिशियन डॉ. मधू यांना धोनीसोबत मुंबईला पाठवले आहे. खरं तर, डॉ. दिनशॉ परडीवाला यांनीच भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यावरही उपचार केले होते. मागील वर्षा पंत रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर मुंबईच्या याच रुग्णालयात उपचार झाले होते.
एमएस धोनी याने आयपीएल संपल्यानंतर आपल्या चाहत्यांना खास संदेश दिला होता. तो म्हणाला होता की, तो आताच निवृत्तीची घोषणा करणार नाही. पुढील वर्षी त्याला पूर्ण फिट होऊन पुन्हा मैदानावर पुनरागमन करायला आवडेल. (csk captain ms dhoni may undergo knee surgery on thursday under the dr dinshaw pardiwala)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL संपताच गुजरातचा हुकमी एक्का दुखापतग्रस्त, महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर पडल्याने राष्ट्रीय संघाला धक्का
काय कॅच आहे! पठ्ठ्याने चित्त्याची चपळाई दाखवत एका हाताने पकडला अफलातून झेल, सतत पाहिला जातोय व्हिडिओ