MS Dhoni Hairstyle: भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी हा नेहमीच त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. धोनी सोशल मीडियावर क्वचितच एखादी पोस्ट शेअर करतो, पण त्याचे चाहते त्याचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल करत असतात. अशातच चाहते धोनीचा एक व्हिडिओ जोरदार शेअर करत आहेत, ज्यात धोनी त्याच्या लांब केसांविषयी बोलत आहे.
धोनीने का ठेवले लांब केस?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एमएस धोनी आयपीएल 2024 (MS Dhoni IPL 2024) हंगामापूर्वी लांब केस ठेवण्यामागील खुलासा करताना दिसला. त्याने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, त्याने पुन्हा लांब केस का ठेवले आहेत. खरं तर, धोनीने सन 2007मध्ये टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याचे लांब केस कापले होते. त्यानंतर चाहत्यांनी त्याला अनेक हेअरस्टाईलमध्ये पाहिले, पण प्रत्येकाला आजही धोनीची लांब केसांची हेअरस्टाईल खूप आवडते.
अशात आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामापूर्वी पुन्हा एकदा एमएस धोनी (MS Dhoni) याने लांब केस ठेवले आहेत. एका कार्यक्रमात धोनीने लांब केस ठेवण्यामागील कारण सांगत म्हटले की, त्याला नवीन हेअरस्टाईल (MS Dhoni New Haistyle) ठेवण्यात खूपच समस्या होते. धोनी म्हणाला, तो लांब केस यासाठी ठेवत आहे, कारण त्याच्या चाहत्यांना हे खूप आवडतात. मात्र, त्याने हेही सांगितले की, त्याला जास्त त्रास झाला, तर तो केस कापेल.
धोनी म्हणाला, “ही हेअरस्टाईल मेंटेन करणे खूप कठीण आहे. पूर्वी मी 20 मिनिटांत तयार व्हायचो. आता 1 तास 10 मिनिटे लागतात. चाहत्यांना ही हेअरस्टाईल आवडते, म्हणून मी ती ठेवतोय, पण एखाद्या दिवशी मी जागा होईल आणि ठरवेल की आता बास. मी केस कापेन.”
MS Dhoni said, "maintaining this hairstyle is very difficult. Earlier I used to get ready in 20 mins, now it takes 1 hour 10 minutes. I'm doing because fans are liking it, but someday I wakes up and decide it's enough, I'll cut it down".pic.twitter.com/qknk36Spop
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 27, 2023
धोनीची कामगिरी
धोनीविषयी बोलायचं झालं, तर त्याने क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला आहे, जो आजपर्यंत कुठल्याच खेळाडूला जमला नाहीये. तो म्हणजे, धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसीचे तीन किताब जिंकून दिले आहेत. तो अशी कामगिरी करणारा एकमेव कर्णधार आहे. धोनीने 2007मध्ये टी20 विश्वचषक, 2011मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तसेच, आयपीएल स्पर्धेत त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाला आपल्या नेतृत्वाखाली पाच वेळा किताब जिंकून दिला आहे. आयपीएल 2024 हंगामातही धोनी सीएसकेला ट्रॉफी जिंकून देण्याचा प्रयत्न करताना दिसेल. (csk captain ms dhoni reveals reason behind of his long hairstyle ahead of ipl 2024 know here)
हेही वाचा-
‘आज लोकं कौतुक करतायेत, पण 3-4 महिन्यांपूर्वी शिव्या…’, शतक ठोकल्यानंतर राहुलनं टीकाकारांना झापलं; वाचाच
हे प्रभू, हे हरिराम…! लिफ्टमध्ये अडकलेले थर्ड अंपायर, सामनाही थांबवला; वॉर्नरही रोखू शकला नाही हसू; Video