आयपीएलच्या १३ व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गतउपविजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. हा सामना आबु धाबीच्या शेख जयेद स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जात आहे. तत्पुर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय फलंदाज सौरभ तिवारीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे, तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिसनही पहिल्या सामन्याचा भाग आहे. यासह त्याने चेन्नईविरुद्धच्या या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.
याबरोबरच चेन्नईचा दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याच्याजागी दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज लुंगी एनडिगीला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. तर, आयपीएल २०२० लिलावात ५.५० कोटी रुपयांना संघात विकत घेतलेल्या इंग्लंडच्या सॅम करनलाही अंतिम ११ खेळाडूंमध्ये सहभागी करण्यात आले आहे.
असा आहे मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्याकुमार यादव, सौरभ तिवारी, क्रुणाल पंड्या, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, जेम्स पॅटिसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह
असा आहे चेन्नई सुपर किंग्स संघ
मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, सॅम करन, दीपक चाहर, पियुष चावला आणि लुंगी एनडिगी