इंडियन प्रीमियर लीगचा 16वा हंगाम सुरू असून अंतिम फेरीच्या लढतीसाठी संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. रविवारी (दि. 14 मे) कोलकता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स आमने सामने होते. यावेळी सीएसकेने 145 धावांचे आव्हान केकेआरसमोर ठेवले. केकेआरने 6 गडी राखून सीएसकेला पराभूत केले. हा हंगाम महेंद्र सिंग धोनी याच्यासाठी शेवटचा असल्याचे बोलले जात आहे, पण आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचा आयपीएल 2023 (Indian Premier League 2023) नंतर निवृत्ती घेण्याचा विचार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना सातत्याने पडत आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर ‘माही’ने मैदानाची एक फेरी घेतली. यावेळी, चाहत्यांना सही केलेले चेंडू देखील दिले. यामुळे अशी अटकळ बांधली जाऊ लागली की, कदाचित आयपीएल 2023 (IPL 2023) हा माहीच्या कारकिर्दीचा शेवटचा हंगाम असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, धोनीने यावर अद्याप उघडपणे काहीही सांगितले नाही, पण त्याच्या हालचाली पाहून चाहत्यांनी अंदाज लावला की, कदाचित धोनीची आयपीएलला अलविदा करण्याची वेळ जवळ आली आहे.
सीईओंनी केला खुलासा
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन (CSK CEO Kashi Viswanathan) यांनी या अफवांबाबतची पुष्टी केली आहे की, धोनी पुढील हंगामातही खेळू शकतो. यासोबतच त्यांनी चाहत्यांना प्रत्येक हंगामात सीएसके संघाला पाठिंबा देण्याची विनंती देखील यावेळी केली आहे. पुढे विश्वनाथन म्हणाले की, “आम्हाला विश्वास आहे की, धोनी पुढच्या हंगामातही खेळेल, त्यामुळे मी आशा करतो की, चाहत्यांनी दरवेळेप्रमाणेच आम्हाला पाठिंबा द्यावा.”
अफवेला आले उधान
आयपीएलचा 16वा हंगाम सुरू होण्याआधी पासूनच माहीच्या निवृत्तीबाबत (Mahendra Singh Dhoni Retirement news) अटकळ बांधली जात होती की, धोनीच्या कारकीर्दीतील हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. मात्र, धोनीने यावर अद्याप कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. डॅनी मॉरिसन या समालोचकाने नाणेफेकीच्या वेळी त्याला विचारले की, त्याला त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळताना कसे वाटत आहे. ज्यावर धोनीने उत्तर दिले की, “शेवटच्या हंगामाबाबत तुम्ही म्हणत आहात, मी नाही.” यावरून असा अंदाज बांधला जात आहे की धोनी पुढचा हंगाम खेळण्याचा देखील विचार करत आहे. (CSK CEO Kashi Viswanathan on Mahendra Singh Dhoni Retirement IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाने सांगितले IPL 2023मधील सर्वोत्तम फिनिशरचे नाव, समोर कुणीही असो बॅटमधून ओकतो आग
पंचांच्या चुकीची संपूर्ण केकेआरला मोजावी लागली किंमत, सर्व खेळाडूंचा खिसा झाला रिकामा