इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाला सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्स संघाने सर्वांना मोठा धक्का दिला. एमएस धोनी संघाने १२ वर्षे चेन्नईचे कर्णधारपद सांभाळल्यानंतर नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या हंगामाच्या सुरुवातीला चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्या खांद्यावर टाकण्यात आली. पण, त्याने ८ सामन्यानंतर ही जबाबदारी आपल्या खांद्यावरून उतरवली आणि पुन्हा एकदा धोनीकडे चेन्नईचे कर्णधारपद आले. त्यामुळे याबद्दल अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिली आहे. यात शेन वॉटसनचाही समावेश आहे.
द ग्रेड क्रिकेटर पॉडकास्टशी बोलताना शेन वॉटसन म्हणाला, ‘जेव्हा मी सुरुवातीला ऐकले की, जडेजा कर्णधार होणार आहे, तेव्हा मी चकीत झालो होतो. कारण सर्वांना माहित आहे की, एमएस धोनीला मैदानात जो आदर मिळतो आणि जो प्रभाव आहे, तो सर्वांना माहित आहे. त्यामुळे जडेजासाठी काहीही झाले तरी हे कठीणच होणार होते. अखेर मला जडेजाबद्दल थोडे वाईट वाटत आहे. कारण, तो चांगला क्रिकेटपटू असून तो प्रगती करत आहे.’
शेन वॉटसनने हे देखील सांगितले की, नेतृत्व करताना किती दबाव असतो. शेन वॉटसनने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. त्यानेही २०१५ साली अर्ध्यातून नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘मी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्तव केले आहे. मला माहित आहे की, जेव्हा तुम्ही दबावात असता, तेव्हा हे किती कठीण असते. त्यामुळे जडेजाला नेतृत्व सोडल्याबद्दल अभिनंदन.’ शेन वॉटसनने २०१८ ते २०२० या दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधत्वही केले आहे.
जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ८ पैकी केवळ २ सामने जिंकले. तसेच ६ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे चेन्नई पहिल्यांदाच हंगामातील पहिले ४ सामने सलग पराभूत झाली. तसेच जडेजाची यादरम्यान वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही. त्यामुळे त्याने वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
मानलं भावा! मॅक्सवेलने जडेजा आणि मोईनची गोलंदाजी पाहून चेन्नईच्याच गोलंदाजांच्या उडवल्या दांड्या
मुंबई इंडियन्समध्ये नव्याने एंट्री केलेला ट्रिस्टन स्टब्स आहे तरी कोण? जाणून घ्या त्याची कामगिरी