इंडियन प्रीमिअर लीगमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू सहभागी होत असतात. अनेक देशांचे खेळाडू या लीगमध्ये मिळून मिसळून खेळत असल्यामुळे ते एकमेकांकडून नेहमीच खेळातील विविध गोष्टी शिकत असतात. असेच काहीसे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलबाबतही आहे. मॅक्सवेल आयपीएल २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत आहे. हंगामातील ४९वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यानंतर बोलताना मॅक्सवेलने खुलासा केला की, तो मोईन अली आणि रवींद्र जडेजाची गोलंदाजी पाहून त्याला स्वत:ला गोलंदाजीत मदत झाली.
काय म्हणाला मॅक्सवेल?
सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) म्हणाला की, “ज्याप्रकारे मोईन अली (Moeen Ali) आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पहिल्या डावात गोलंदाजी केली, त्यावरून समजले की, धिम्या खेळपट्टीवर कशाप्रकारे गोलंदाजी करायची आहे. मी शक्य तितके विकेट टू विकेट गोलंदाजी करण्यावर लक्ष देत होतो. कारण, चेंडूवर पकड मिळवणे सोपे होत होते. ज्यामुळे मला गोलंदाजी करण्यात मदत मिळाली.”
“हे खरोखर एक चांगल्या गोलंदाजीचा प्रयत्न होता. आम्हाला जाणवले की, आमच्या फिरकीपटूंना खेळपट्टीतून मदत मिळत आहे. तसेच, आमच्या वेगवान गोलंदाजांनी अखेरच्या षटकात शानदार गोलंदाजी केली आहे. त्यांनी सामना संपवण्यासाठी चांगले काम केले आहे,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
Maxwell strikes in his first over.
Robin Uthappa departs after scoring just 1 run.
Live – https://t.co/qWmBC0lKHS #RCBvCSK #TATAIPL pic.twitter.com/gnZ5F0QVBn
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2022
बेंगलोर संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर विराजमान आहे. मॅक्सवेलला अपेक्षा आहे की, ३ सामन्यांच्या पराभवाचा सिलसिला तोडल्यानंतर संघ विजय मिळवणे सुरू ठेवेल. तसेच, प्लेऑफसाठी क्वालिफायदेखील होईल. पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही या स्पर्धेत समस्यांमधून जात आहोत. त्यामुळे अपेक्षा आहे की, आम्ही विजय मिळवणे सुरू ठेवू शकतो. विजयाची गती रोखणे कठीण आहे आणि आम्हाला वाटते की, आमचे फलंदाज चांगली कामगिरी करणे सुरू करत आहेत.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०२२च्या हंगामात बेंगलोर संघाची गोलंदाजी हीच त्यांची ताकद राहिली आहे. ज्यामुळे त्यांनी चेन्नईच्या ८ फलंदाजांना तंबूत धाडत २० षटकात १६० धावांवर रोखले. यावेळी हर्षल पटेलने ४ षटके गोलंदाजी करताना ३५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, जोश हेजलवूड, शाहबाज अहमद आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
सामन्याविषयी थोडक्यात
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करताना बेंगलोरने ८ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला ८ विकेट्स गमावत फक्त १६० धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरने हा सामना १३ धावांनी खिशात घातला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर