Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्समध्ये नव्याने एंट्री केलेला ट्रिस्टन स्टब्स आहे तरी कोण? जाणून घ्या त्याची कामगिरी

मुंबई इंडियन्समध्ये नव्याने एंट्री केलेला ट्रिस्टन स्टब्स आहे तरी कोण? जाणून घ्या त्याची कामगिरी

May 6, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Tristan-Stubbs

Photo Courtesy: Twitter/OfficialCSA


इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात मुंबई इंडियन्स संघ संघर्ष करताना दिसत आहे. त्यातच त्यांना एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर गेला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी ट्रिस्टर स्टब्स याला बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्स संघामध्ये स्थान देण्यात आले आहे.

मिल्सला (Tymal Mills) आयपीएल २०२२ लिलावात (IPL 2022) १.५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ५ सामन्यात संधी दिली. यात त्याला ६ विकेट्स मिळाल्या होत्या. पण, तो दुखापतग्रस्त झाला असल्याने आता २१ वर्षीय ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. तो मधल्या फळीतील यष्टीरक्षक फलंदाज असून त्याने नुकतीच झिम्बाब्वेविरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात स्थान मिळवले होते.

१४ ऑगस्ट २००० रोजी जन्म झालेल्या ट्रिस्टन स्टब्स याने २०२० मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचवर्षी त्याचे अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये, तर टी२० क्रिकेटमध्ये २०२१ मध्ये त्याने पदार्ण केले. त्याने काहीदिवसांपूर्वीच संपलेल्या सीएसए चॅलेंज स्पर्धेत ४८.८३ च्या सरासरीने २९३ धावा केल्या होत्या. त्याने आत्तापर्यंत ८ प्रथम श्रेणी सामने खेळले असून २ शतके आणि १ अर्धशतकासह ४६५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १ अर्धशतकासह २७५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर १७ टी२० सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांसह ५०६ धावा केल्या आहेत.

त्याच्यापूर्वी मुंबईने कुमार कार्तिकेय सिंग याला देखील बदली खेळाडू म्हणून संघात स्थान दिले होते. त्याला मोहम्मद अर्शद खान याच्याऐवजी संघात स्थान मिळाले.

मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर 
मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यातील ८ सामने पराभूत झाले आहेत आणि एक सामना जिंकला आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ हंगामातील पहिले ८ सामने सलग पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी ९ वा सामना जिंकला. हंगामातील पहिले ८ सामने सलग पराभूत होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘वडापाव मी कधी खाल्ला नाही’, मुंबईतील प्रसिद्ध पदार्थाबद्दल चाहत्याच्या उत्तरावर कमिन्सची लक्षवेधी प्रतिक्रिया

‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर

Video: भुवनेश्वरने ऐनवेळी बदलली भूमिका, मग वॉर्नरनेही अफलातून शॉटने दाखवला आपला क्लास


ADVERTISEMENT
Next Post
Kane-Williamson

हैदराबादच्या पराभवाला जबाबदार खुद्द विलियम्सन? कॅच सोडल्यामुळे फलंदाजाने २४५च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा

Glenn-Maxwell

मानलं भावा! मॅक्सवेलने जडेजा आणि मोईनची गोलंदाजी पाहून चेन्नईच्याच गोलंदाजांच्या उडवल्या दांड्या

Ravindra-Jadeja

'जडेजाबद्दल वाईट वाटतंय, पण चेन्नईचे नेतृत्व सोडल्याबद्दल त्याचे अभिनंदन', वाचा असं का म्हणाला वॉटसन

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.