एमएस धोनी अर्थात चाहत्यांचा लाडका ‘थाला’. धोनीला पाहण्याची किंवा त्याला भेटण्याची इच्छा ही प्रत्येक क्रिकेटप्रेमीची असते अन् आहे. परंतू थाला प्रेमी मात्र त्याची एक झलक पाहण्यासाठी वेडेपिसे होतात. हे तेच चाहते आहेत, जे धोनी मैदानावर दिसला की कानठाळ्या बसाव्यात इतके ओरडतात. धोनीला देव मानणारा देखील एक वर्ग आहे. त्यामुळेच एमएस धोनीच्या अशा चाहत्यांच्या अनेक हटके स्टोरीज देखील आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. अशीच एक स्टोरी आता सर्वांसमोर आली आहे.
मंडळी तुम्हाला आठवत असेल गेल्यावर्षी एक धोनी फॅन त्याच्या लाडक्या थालाला पाहण्यासाठी बाईक विकून आलेल्या पैशातून सीएसकेची मॅच पाहायला गेला होता. आताही अशाच एका खास फॅनची कहानी सर्वांसमोर आलीये. ह्या फॅनने तर कहर केलाय. या धोनीवेड्या फॅनने आपल्या मुलींच्या शाळेची फी रोखून धरली आणि ते पैसे अगोदर धोनीप्रेमाकरिता खर्च केलेत. ( CSK Fan Who Paid Rs 64000 to Watch MS Dhoni Yet to Pay Daughters School Fees Read Story )
एका दाक्षिणात्य चॅनलवर सीएसकेच्या या फॅनने मातृभाषेत मुलाखत दिलीये. त्यात त्याने बोलताना म्हटले की, सीएसकेची मॅच पाहण्यासाठी त्याने तब्बल 64 हजार रुपये खर्च केलेत. फॅनने सांगितले की त्याला मॅचचे तिकीट मिळत नव्हते म्हणून त्याने ब्लॅक मार्केटमधून तिकीट विकत घेतले.
‘मला तिकीट मिळत नव्हते. म्हणून मला ब्लॅक मार्केटमधून तिकीट घ्यावे लागले. त्यासाठी मी 64 हजार रुपये मोजले. मला अजून माझ्या मुलीच्या शाळेची फी भरायचीये. परंतू धोनीला एकदातरी पाहावे म्हणून आधी तिकीटाला पैसे खर्च केले.’ असे या फॅनने सांगितले.
I don’t have money to pay the School Fees of my children, but spent Rs 64,000 to get black tickets to watch Dhoni, says this father. I am at a loss for words to describe this stupidity. pic.twitter.com/korSgfxcUy
— Dr Jaison Philip. M.S., MCh (@Jasonphilip8) April 11, 2024
धोनीचा हा फॅन त्याच्या तिन्ही मुलींसह स्टेडियमवर आला होता. त्यांनी धोनीला प्रत्यक्ष खेळताना पाहिले आणि त्यानंतर ह्या गोष्टींचा उलगडा केला. सोशल मीडियावर धोनीच्या फॅनची ही स्टोरी व्हायरल झाल्यापासून नेटकरी विविध मत व्यक्त करत आहेत. अनेकांना वडिलांची ही थाला प्रेमाची गोष्ट तितकी आवडलेली दिसत नाही. मुलींची शाळेची फी न भरता मॅच पाहायला नेण्याचा निर्णय चुकल्याचे काही जण म्हणतायेत.
अधिक वाचा –
– लखनऊच्या निकोलस पुरनची दांडी गुल करणारा कुलदीप यादवचा जादूई चेंडू पाहिलात का? कितीदा पाहा Video मनच नाही भरणार
– रोहित-विराटमध्ये टी20 विश्वचषकाबाबत चर्चा? मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधील भेट चर्चेत
– हार्दिक पांड्याविषयी ‘हे’ काय बोलला ईशान किशन! जाणून घ्या एका क्लिकवर