---Advertisement---

‘या’ कारणामुळे कोरोनाची लागण झालेल्या माईक हसी, बालाजीला एअर ॲम्ब्युलन्सद्वारे हलवण्यात आले चेन्नईत

On: गुरूवार, मे 6, 2021 7:28 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक माइकल हसी आणि गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपति बालाजी यांना त्यांच्या संघाद्वारे दिल्लीहून एअर अंबुलन्सद्वारे चेन्नईला पाठवण्यात आले आहे. हसी आणि बालाजी या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नई संघ सध्या दिल्लीत असून तेथून खेळाडू व कर्मचारी हळू हळू आपल्या घरी परतत आहेत. सर्व खेळाडू सुरक्षित घरी परतल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज(६ मे) संध्याकाळी रांचीला रवाना होणार आहे.

सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमची चेन्नई येथे चांगली ओळख आहे. त्यामुळे हसी आणि बालाजी या दोघांनाही चेन्नईला नेण्याचे ठरवले. कारण आम्हाला सुनिश्चित करायचे होते की, आमच्याकडे पर्याप्त सुविधा उपलब्ध असाव्यात. सुदैवाने, त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत आणि दोघेही बरे होत आहेत. मात्र हसीला भारत सोडून जाण्यापूर्वी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची वाट पहावी लागेल. जेव्हा हसी प्रवास करण्यासाठी सुरक्षित असेल तेव्हा आम्ही एका चार्टर्ड विमानाची व्यवस्था करू.”

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हसीमध्ये सौम्य कोरोना लक्षणे दिसत आहेत. सध्या तो त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जच्या देखरेखीखाली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड व बीसीसीआय हसीच्या सुरक्षित मायभूमीत परतण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत आहेत.

सध्या आयपीएल २०२१ हंगाम स्थगित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने हा निर्णय बीसीसीआय आणि आयपीएल कमीटीने घेतला आहे. त्यामुळे आता पुढे उर्वरित हंगाम कधी आयोजित होणार किंवा आयपीएलच्या या हंगामाबद्दल काय निर्णय घेतला जाणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाली असली तरी लवकरच ‘ही’ मोठी स्पर्धा येणार क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला

विलियम्सनसह ‘या’ ४ सदस्यांना भारतात ठेऊन न्यूझीलंडचे अन्य खेळाडू मायदेशी रवाना

दु:खद! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचे झाले कोरोनाने निधन; दोन आठवड्यांपूर्वीच गमावले होते आईला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---