वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आयपीएलमध्ये दीर्घ काळापासून चेन्नई सुपरकिंग्ज कडून खेळलेल्या ड्वेन ब्राव्होने कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) मधून निवृत्ती जाहीर केली आहे. सीपीएलचा सध्याचा हंगाम हा त्याचा शेवटचा हंगाम असेल, असे ड्वेन ब्राव्होने म्हटले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. ड्वेन ब्राव्होने याआधीच आयपीएल आणि टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली होती पण तो सीपीएलमध्ये खेळत होता. मात्र आता त्याने या लीगलाही अलविदा केला आहे. या मोसमात चाहत्यांना तो शेवटचा खेळताना दिसेल.
ड्वेन ब्राव्होबद्दल बोलायचे झाले तर कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या स्पर्धेत त्याने एकूण पाच विजेतेपदे जिंकली. त्यापैकी तीन त्याने कर्णधार म्हणून जिंकले. त्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळताना या स्पर्धेत त्याचा विक्रम अतिशय उत्कृष्ट होता. त्याने आपल्या सीपीएल कारकिर्दीला या संघातून सुरुवात केली आणि याच संघातून त्याचा शेवटही होईल.
END OF A CHAMPION ERA!
West Indies all-rounder Dwayne Bravo announces his retirement from franchise Twenty20 cricket.
Details ⏩https://t.co/lmIhaHSv1Z pic.twitter.com/9F7PF6XXEq
— Sportstar (@sportstarweb) August 31, 2024
ड्वेन ब्राव्होने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. ज्यामध्ये तो म्हणाला, “हा प्रवास खूपच छान झाला आहे. माझ्या कॅरेबियन लोकांसमोर माझी शेवटची व्यावसायिक स्पर्धा खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. त्रिनबागो नाईट रायडर्स हा असा संघ आहे. ज्यासोबत माझा प्रवास सुरू झाला होता आणि आता त्याचा शेवटही होत आहे”.
ड्वेन ब्राव्होच्या एकूणच टी20 करिअरबद्दल बोलायचे झाले तर, त्याची एकूण टी20 कारकीर्द खूप चांगली आहे. टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ड्वेन ब्राव्होने आपल्या टी20 कारकिर्दीत आतापर्यंत 578 सामन्यांमध्ये 630 विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राशिद खान आहे, ज्याने 613 विकेट्स घेतल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा सुनील नारायणआहे. ज्याने आतापर्यंत 557 विकेट घेतल्या आहेत. ड्वेन ब्राव्हो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता. पण तो तिथे आधीच निवृत्त झाला होता. आता तो सीएसकेमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करतो.
हेही वाचा-
जो रूटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण…! अशी कामगिरी करणारा कितवा खेळाडू?
ऐतिहासिक…! टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा ‘हा’ एकमेव भारतीय
BAN vs PAK: बाबर आझम पुन्हा ढेपाळला, चाहत्यांनी दिला निवृत्तीचा सल्ला