रविवारी (दि. 30 एप्रिल) आयपीएल 2023चा 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स संघात खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने विजयासाठी दिलेले 201 धावांचे आव्हान पंजाब किंग्सने अखेरच्या चेंडूवर 4 गडी राखून पार केले. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचवेळी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सीएसके मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीनै आपण निवृत्त होणार असल्याचे कोणतेही संकेत दिले नसल्याचे म्हटले.
धोनीने या सामन्यात अखेरच्या दोन चेंडूवर दोन षटकार मारून सर्वांची मने जिंकली. या संपूर्ण हंगामात तो अशाच सातव्या आठव्य क्रमांकावर फलंदाजीला येत आहे. धोनी 41 वर्षांचा असल्याने तो या हंगामानंतर निवृत्त होईल अशी चर्चा सुरूये. त्याबद्दल बोलताना फ्लेमिंग म्हणाले,
“त्याला सर्व ठिकाणी भरपूर पाठिंबा मिळतोय. मात्र, निवृत्त होणार असल्याचे कोणतेही संकेत त्याने आम्हाला तरी दिले नाहीत.”
दरम्यान, सीएसकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. निर्धारित 20 षटकांमध्ये सीएसकेने 4 बाद 200 धावा साकारल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने शेवटच्या चेंडूवर तीन धावा घेत विजय मिळवला. 15 षटके संपल्यानंतर सीएसकेची धावसंख्या 3 बाद 129 धावा होती. पण 16 व्या षटकात तुषार देशपांडे याने 24 धावा खर्च केल्या. तर पुढच्याच षटकात रविंद्र जडेजा याने 17 धावा खर्च केल्या. या दोन षटकांमध्ये पंजाबच्या फलंदाजांना सुरू सापडला आणि संघ लक्ष्याचा जवळ देखील पोहोचला. शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 9 धावा हव्या होत्या. या षटकात युवा मथिशा पथिरानाने चांगली गोलंदाजी केली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सिकंदर रजा (7 चेंडूत 13 धावा) याने शेवटच्या चेंडूवर तीन धावा घेतल्याने पंजाबला विजय मिळाला.
(CSK Head Coach Stephen Fleming Said MS Dhoni Not Indicate He Will Retire This Year)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवांनी हलले राजस्थान-सीएसकेचे सिंहासन! मुंबईची मुसंडी मारण्यास सुरुवात, अशी आहे गुणतालिका
डेव्हिड-पोलार्डची तुलना होऊ लागल्यावर कॅप्टन रोहितचे मोठे वक्तव्य, म्हणाला “त्याच्याकडे क्षमता आहे. मात्र…”