चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023चा अंतिम सामना रविवारी (28 मे) रात्री खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. प्रत्येकजण हा सामना अटीतटीचा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्याचवेळी सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एक ट्विट करत आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
चेन्नई त्यासाठी सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. फ्लेमिंग अगदी पहिल्या वर्षीपासून चेन्नई संघाचा भाग आहेत. पहिल्या वर्षी ते संघाचे खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. या अंतिम सामन्यापूर्वी त्यांनी ट्विट करत लिहिले,
Not long now until the final game so a perfect time to say ‘thank you’ for all the support that the team has received this year. We all understand the love for the captain but to see the grounds so full of yellow has been truely amazing.🙏enjoy tonight, it should be a cracker.
— Stephen Fleming (@SPFleming7) May 28, 2023
‘अंतिम सामन्याला आता फार काळ नाही म्हणून या वर्षी संघाला दिलेल्या सर्व समर्थनासाठी ‘धन्यवाद’ म्हणण्याची योग्य वेळ आहे. कर्णधारावरील प्रेम आपल्या सर्वांनाच समजते. मात्र, पिवळ्या रंगाने भरलेले मैदान पाहणे खरोखरच आश्चर्यकारक होते. आज रात्रीचा आनंद घ्या, हा सामना शानदार असेल.’
या हंगामात चेन्नईची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली पाहायला मिळाली. मागील हंगामात आठव्या क्रमांकावर राहिलेल्या चेन्नईने यावेळी मुसंडी मारली. साखळी फेरीत गुजरातनंतर त्यांनी 8 विजय मिळवत दुसरे स्थान काबीज केले. त्यानंतर पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्यांनी गुजरातचाच पराभव केला होता. दोन्ही संघातील आमने-सामने कामगिरी पाहायची झाल्या, गुजरात संघाचे पारडे चेन्नईविरुद्ध जड असल्याचे दिसते. दोन्ही संघात आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 3 सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे, तर उर्वरित 1 सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. आयपीएल 2023च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरातला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
(CSK Headcoach Stephen Fleming Thank You Tweet IPL 2023 Final)