इंडियन प्रीमियर लीग २०२२चा अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईने जबरदस्त प्रदर्शन केले. परंतु प्रत्युत्तरात चेन्नईच्या फलंदाजांना साजेशा खेळी करता आल्या नाहीत. परिणामी त्यांना हंगामातील सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबने ५४ धावांनी सामना जिंकत त्यांचा हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांमध्ये ८ बाद १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईला १२६ धावाच धावाच करता आल्या आणि त्यांनी त्यांच्या सर्व १० विकेट्सही गमावल्या.
पंजाबच्या १८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केले. चेन्नईकडून एकट्या शिवम दुबेने चिवट झुंज दिली. त्याने ३० चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ६ चौकारांच्या साहाय्याने ५७ धावांनी जबरदस्त खेळी केली. तसेच एमएस धोनीनेही २३ धावांची संथ खेळी करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर फलंदाज सपशेल फेल ठरल्यामुळे चेन्नईचा संघ १८ षटकांमध्ये १२६ धावांवरच गुंडाळला गेला.
या डावात पंजाबकडून राहुल चाहरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तसेच पदार्पणवीर वैभव अरोरा व लियाम लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले.
तत्पूर्वी पंजाबकडून लियाम लिविंगस्टोन याने जबरदस्त खेळी केली. एका बाजूने विकेट्स जात असताना त्याने ३२ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि ५ चौकार मारत ६० धावांची झटपट खेळी केली. त्याच्याबरोबरच सलामीवीर शिखर धवन याने ३३ धावा आणि जितेश शर्मा याने २६ धावा, अशा उपयुक्त खेळी केल्या. या खेळींच्या जोरावर पंजाबला धावफलकावर १८० धावा लावता आल्या होत्या.
या डावात चेन्नईकडून ख्रिस जॉर्डन आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. त्यांनी संघाला प्रत्येकी २ विकेट्स मिळवून दिल्या होत्या. तसेच आपला दुसराच आयपीएल सामना खेळत असलेल्या मुकेश चौधरी यानेही या सामन्यात त्याची पहिली विकेट घेतली होती. त्याने पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालला बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबच्या नव्या शिलेदाराने पदार्पणातच मैदान मारलं, चेन्नईच्या २ तगड्या फलंदाजांना बाद केलं
दोघांच्या समान धावा, पण तरीही जोस बटलर ऐवजी इशान किशनकडे ऑरेंज कॅप कशी? वाचा काय आहे नियम
अनहोनी को होनी कर गए धोनी..! माहीच्या ‘सुपरफास्ट’ रनआऊटची चर्चा, दाखवली चित्यासारखी चपळता