रविवारी (०३ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज या संघात मुंबईच्या मैदानावर झालेला आयपीएल २०२२मधील अकरावा अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबला पावरप्लेमध्ये मोठे धक्के बसले. प्रत्युत्तरात चेन्नईनेही पावरप्लेमध्ये झटपट त्यांच्या विकेट्स गमावल्या. विशेष म्हणजे, या सामन्यात उभय संघातील नवख्या गोलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवत त्यांच्या पहिल्यावहिल्या आयपीएल विकेट्स घेतल्या.
या सामन्यात पंजाबकडून वैभव अरोरा (Vaibhav Arora) या २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाला आयपीएल पदार्पणाची (IPL Debut) संधी देण्यात आली होती. अरोरानेही त्याच्या पदार्पणाला अविस्मरणीय बनवण्याचे काम केले.
पंजाबच्या १८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. मात्र त्यांना संघाला अपेक्षित सुरुवात करून देता आली नाही. पंजाबकडून अनुभवी गोलंदाज कागिसो रबाडा याने दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शिखव धवनच्या हातून ऋतुराजला १ धावेवर झेलबाद केले. त्यानंतर डावातील तिसरे व स्वतचे दुसरे षटक टाकण्यासाठी अरोरा आला होता.
त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अनुभवी उथप्पाने खराब फटका खेळला आणि मिड-ऑफवर कर्णधार मयंक अगरवालने उथप्पाचा जबरदस्त झेल टिपला. अशाप्रकारे अरोराला त्याची आयपीएलमधील पहिली विकेट (Vaibhav Arora’s IPL Maiden Wicket) मिळाली. उथप्पा १३ धावा करून बाद झाला. त्यानंतर पुढे त्याने आपल्या प्रदर्शनातील सातत्य कायम ठेवत चेन्नईचा खतरनाक फलंदाज मोईन अली याला शून्यावर बाद केले. अशाप्रकारे अरोराने पदार्पणात ४ षटके गोलंदाजी करताना २१ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1510656960794087425?s=20&t=Q_sVXagPq3qde83VDpsA1Q
चेन्नईच्या नव्या गोलंदाजानेही मारलं मैदान
तत्पूर्वी चेन्नईकडून दुसराच आयपीएल सामना खेळत असलेल्या मुकेश चौधरी यानेही अप्रतिम गोलंदाजी केली. चौधरीने त्याच्या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू असा काही फेकला की, मयंकने पुन्हा त्यावर कव्हर पाँईटला जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या रॉबिन उथप्पाने त्याचा चेंडू अचूक टिपला. परिणामी केवळ ४ धावा करून मयंकला पव्हेलियनला परतावे लागले. मात्र चौधरीसाठी मयंकची विकेट विक्रमी आणि अविस्मरणीय ठरली. ही त्याची आयपीएलमधील पहिलीच (Mukesh Choudhary IPL Maiden Wicket) विकेट होती.
महत्त्वाच्या बातम्या-
दोघांच्या समान धावा, पण तरीही जोस बटलर ऐवजी इशान किशनकडे ऑरेंज कॅप कशी? वाचा काय आहे नियम
अनहोनी को होनी कर गए धोनी..! माहीच्या ‘सुपरफास्ट’ रनआऊटची चर्चा, दाखवली चित्यासारखी चपळता






