---Advertisement---

मोईन अलीच्या मागणीला आले यश! चेन्नईने त्याच्यासाठी खास जर्सीत केला ‘हा’ बदल

On: रविवार, एप्रिल 4, 2021 7:38 PM
---Advertisement---

येत्या काही दिवसात भारतात क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. ९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने देखील सरावाला सुरुवात केली आहे. गतवर्षी ७ व्या क्रमांकावर असणाऱ्या सीएसके संघाला या हंगामात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे. तसेच गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून खेळलेला मोईन अली या हंगामात सीएसके संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या हंगामासाठी सीएसके संघाने मोईन अलीसाठी मोठा बदल त्याच्या जर्सीत केलेला पाहायला मिळाला आहे.

आयपीएल २०२१ च्या लिलावात मोईन अली याला सीएसके संघाने ७ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. काही दिवसांपूर्वीच सीएसके संघाने आपली नवीन जर्सी लाँच केली होती. ज्यामध्ये एसएनजी १०००० या मद्य उत्पादन कंपनीचा देखील लोगो होता. त्यामुळे मोईन अली याने ही जर्सी परिधान करण्यास नकार दिला होता.

खरंतर मोईन अली हा इस्लाम धर्माचे पालन करतो, त्यामुळे तो मद्यपान देखील करत नाही. यामुळे सीएसके संघाने मोईन अलीच्या जर्सीवरील मद्यविक्री करणाऱ्या कंपनीचा लोगो काढून टाकला आहे. दक्षिण आफ्रिकन संघाचा माजी फलंदाज हाशिम आमला याने देखील या गोष्टींना सुरुवातीपासूनच विरोध केला आहे.

आयपीएल २०१८ मध्ये मोईन अली याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १९ सामने खेळले आहेत. यात त्याने २०.६ च्या सरासरीने ३०९ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने १० गडी देखील बाद केले आहेत. आगामी हंगामात तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या –

सीेएसकेच्या चिंतेत वाढ! जोश हेजलवूडची माघार, ‘या’ दोन गोलंदाजांनी दिला खेळण्यास नकार

व्हिडिओ : खतरनाक! पाकिस्तानी गोलंदाजाच्या चेंडूने टेंबा बवुमाच्या बॅटचे झाले चक्क दोन तुकडे

कोणावर करण्यात आले हत्येचे आरोप तर कोणी केली शेती; ‘हे’ आहेत आयपीएलनंतर कारकीर्द संपुष्टात आलेले १० क्रिकेटर्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---