आगामी आयपीएल हंगामापूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलताना दिसणार आहेत. तत्पूर्वी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्ज (CSK) मध्ये खेळणारा खेळाडू महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) 2025चा आयपीएल हंगाम खेळणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही.
काही दिवसांपूर्वी, रिपोर्ट्समध्ये असे समोर आले होते की बीसीसीआयने आयपीएल 2025 साठी रिटेंशन पॉलिसी उघड केल्यावर धोनीच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल. आता क्रिकबझच्या मते, जरी बीसीसीआयने प्रत्येक फ्रँचायझीला फक्त 2 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली, तरीही धोनी आयपीएलच्या 18व्या हंगामात खेळेल. पण चेन्नई व्यवस्थापन काय निर्णय घेणार हे धोनीवर अवलंबून आहे.
काही आठवड्यांपूर्वीच बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयपीएल संघ मालकांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत सीएसकेकडून जुना नियम परत आणण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या नियमानुसार 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या कोणत्याही खेळाडूचा लिलावात अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समावेश केला जाईल. मात्र काही संघमालकांनी या नियमावर आक्षेप घेतला होता.
वास्तविक, ऑगस्टच्या अखेरीस रिटेंशन पॉलिसी जाहीर होणार होती, मात्र तोपर्यंत बीसीसीआयने नियम जाहीर केले नव्हते. या कारणास्तव, संघ मालकांनी या संदर्भात बीसीसीआयशी संपर्क साधला असता, रिपोर्ट्सनुसार त्यांना सांगण्यात आले की, खेळाडूंना कायम ठेवण्याबाबतचा निर्णय सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर केला जाईल.”
‘महेंद्रसिंह धोनी’च्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीचे वय सध्या 43 वर्ष 68 दिवस आहे. त्याच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 264 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 39.13च्या सरासरीने फलंदाजी करताना 5,243 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर 24 अर्धशतके आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 84 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वोत्कृष्ट सलामीवीर कोण? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे मोठे वक्त्यव्य
गुरू गंभीरच्या देखरेखीखाली विराटची 45 मिनिटे फलंदाजी, बुमराहनेही गोलंदाजीचा केला सराव
‘या’ दिग्गजांचे महान रेकाॅर्ड्स आजही कायम! कोणत्याही फलंदाजासाठी अशी कामगिरी करणे अशक्य