भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी खेळवली जाणार आहे. तत्पूर्वी खेळाडूंमध्ये देखील उत्साह वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडूंनी बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर उस्मान ख्वाजाने पर्थ येथे 22 नोव्हेंबरपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेसाठी उत्कृष्ट सलामीवीर म्हणून ट्रॅव्हिस हेडचे (Travis Head) नाव घेतले आहे.
फाॅक्स क्रिकेटशी बोलताना उस्मान ख्वाजा (Usman Khwaja) म्हणाला, “शेवटी, हा निवडकर्त्यांचा निर्णय आहे, परंतु जर तुम्ही मला संघात सलामीसाठी निवडले तर लाबुशेन तीन, स्टीव्ह स्मिथ चार पण मला वाटते की ट्रॅव्हिस हेड सलामीसाठी सर्वात योग्य असेल, तो स्पष्टपणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीची सुरुवात करण्यात खूप यशस्वी ठरला आहे, मी कदाचित त्याच्या बाजूने झुकणार आहे, परंतु हा माझा निर्णय नाही, तो निवडकर्त्यांवर अवलंबून आहे.”
पुढे बोलतना ख्वाजा म्हणाला, “सलामीसाठी आल्यानंतर आत्मविश्वास दुप्पट होतो जेव्हा तुम्ही चेंडू चांगला पाहत असता, खूप धावा करत असता आणि तुमच्या मनात फार काही चालत नाही, तेव्हा ते एक उत्तम ठिकाण आहे आणि जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी असता तेव्हा तुमचा आत्मविश्वास बदलतो.”
उस्मान ख्वाजाच्या (Usman Khwaja) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 73 कसोटी, 40 एकदिवसीय आणि 9 टी20 सामने खेळले आहेत. 73 कसोटी सामन्यात त्याने 5,451 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 26 अर्धशतके, 15 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 195 राहिली आहे. 40 एकदिवसीय सामन्यात त्याने 42च्या सरासरीने फलंदाजी करताना 1,554 धावा केल्या आहेत. 9 टी20 सामन्यात त्याने 132.41च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 241 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ दिग्गजांचे महान रेकाॅर्ड्स आजही कायम! कोणत्याही फलंदाजासाठी अशी कामगिरी करणे अशक्य
द गोल्डन आर्म! शेवटच्या षटकात गोलंदाजीला आला अन् श्रेयसने पहिल्याच चेंडूवर काढली विकेट
येत्या काही तासातच भारत-पाकिस्तान संघात होणार अटीतटीची लढत, ‘इथे’ पाहा सामना