---Advertisement---

एमएस धोनीचा अनोखा विक्रम ! हैद्राबादवर मिळवलेल्या विजयानंतर ‘थाला’च्या नावावर नोंदवला गेलाय एक खास रेकॉर्ड, वाचा

CSK MS Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग मधील 46 वा सामना काल (दि. 28 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झाला. हैद्राबादच्या रेकॉर्डब्रेक धावसंख्येला चेन्नईच्या किंग्जने पार करत ऐतिहासिक विजय साकारला. या सामन्यातही प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या धोनीची अर्थात माही भाईची जादू पाहायला मिळाली. आणि याच सामन्यात एमएस धोनी ने एक मोठा विक्रम देखील केला आहे. एक असा विक्रम ज्याच्या जवळपास देखीस कोणीही नाही.

महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 259 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू हा विक्रम अगोदरच धोनीच्या नावावर आहे. परंतू हैद्राबादला पराभूत केल्यानंतर धोनीच्या नावावर एक नवा आणि खास विक्रम नोंदवला गेला आहे. धोनीच्या 259 सामन्यांपैकी 150 सामन्यात त्याने विजयाची चव चाखली आहे. म्हणजेच 150 सामन्यात धोनी हा विजयी झालेल्या संघाचा भाग होता. यासह आयपीएलच्या इतिहासात 150 सामने जिंकणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरला आहे. ( CSK MS Dhoni Becomes First Player To Win 150 Games In Ipl )

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू
एमएस धोनी – 150 विजय
रोहित शर्मा – 133 विजय
रवींद्र जडेजा – 133 विजय
दिनेश कार्तिक – 125 विजय
सुरेश रैना – 122 विजय

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---