इंडियन प्रीमीयर लीगमधील लोकप्रिय संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचेही नाव घेतले जाते. या संघाकडून खेळण्याची अनेक खेळाडूंची इच्छा असते. अशीच संधी एका युवा खेळाडूला मिळाली. त्या खेळाडूचे नाव म्हणजे सलमान खान. त्याची चेन्नई सुपर किंग्स संघात नेट गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. आता याबद्दल त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने एमएस धोनी याने दिलेल्या सल्ल्याबद्दलही खुलासा केला आहे.
सलमान (Salman Khan) हा मुंबईचा रहिवासी असून ऑफ स्पिनर आहे. तसेच तो ग्राउंड्समनचा मुलगा असून त्याने मुंबईमध्येच आपल्या क्रिकेटला सुरुवात केली होती. आता त्याने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) नेट गोलंदाज (Net bowler) होण्यापर्यंत मजल मारली आहे.
याबद्दल सांगताना तो म्हणाला, ‘एकेदिवशी मला चेन्नई सुपर किंग्सकडून फोन आला. त्यांनी मला विचारले की, मी नेट गोलंदाज म्हणून त्यांच्याबरोबर जोडला जाऊ शकतो का. मला नंतर कळाले की तुषार देशपांडेने माझे नाव संघाला सुचवले आहे. मी खुप उत्सुक होतो कारण मला शिकण्याची संधी मिळणार होती. नाहीतर, मी फक्त क्लब क्रिकेट खेळत राहिलो असतो.’
‘मी माही भाई (एमएस धोनी) आणि जडेजा भाई यांच्याबरोबर बोललो. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचे आहे. कदाचीत हे दोन महिने माझे आयुष्य बदलतील,’ असेही इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सलमानने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘मी माही भाईला माझ्या गोलंदाजीबद्दलही विचारले.’
तो पुढे म्हणाला, ‘धोनीने त्याला सांगितले की, ऑफ स्पिनर्सविरुद्ध टी२० मध्ये सर्वजण खूप धावा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे थोडे डोके लावून गोलंदाजी करायची, थोडा जास्त विचार करायचा. त्याने मला काही सामन्यांनंतर चर्चा करू असे सांगितले. फ्रँचायझी आम्हाला सर्वांसारखेच वागवत आहे. आम्हाला सर्वांना मिळते, तशीच वागणूक मिळत आहे. वातावरण खूप मस्त आहे.’
चेन्नई सुपर किंग्स सध्या करतोय संघर्ष
आयपीएल २०२२ हंगामापूर्वी एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्याऐवजी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) संघाचे नेतृत्त्व करत आहे. पण, त्याच्या नेतृत्वाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला पहिल्यांदाच हंगामातील चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. पण पाचव्या सामन्यात विजय मिळवत चेन्नईने पुनरागमन केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या माजी प्रशिक्षकाला आहे विश्वास, यंदा आयपीएलला मिळणार नवा चँपियन; पाहा कोणावर लावलाय दाव
सामना राहिला बाजूला, कुलदीप आणि मॅक्सवेलचं आले आमने सामने; पाहायला मिळाली काट्याची टक्कर