---Advertisement---

CSK Anthem Song | सीएसकेचे नवे अँथम सॉन्ग रिलीज, धांसू अंदाजात दिसतोय ‘थाला’; Video पाहिलाय का?

On: शनिवार, मार्च 26, 2022 6:24 PM
CSK-Anthem-Song
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे बिगूल वाजले असून २६ मार्च रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे हंगामातील उद्घाटन सामना रंगणार आहे. हा सामना गतवर्षीची विजेती चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध उपविजेती कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) या फ्रँचायझींमध्ये होणार आहे. या सामन्यात उभय संघांकडून नवे कर्णधार मैदानात उतरतील. सीएसकेकडून रविंद्र जडेजा तर केकेआरकडून श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून खेळताना दिसेल. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) त्यांचे नवे अँथम गीत रिलीज केले आहे. 

सीएसकेच्या अँथम गीतामध्ये (Chennai Super Kings Anthem) सुरुवातीला धोनी ऑटोरिक्षातून बाहेर येताना दिसतो. यासोबत लगेचच सीएसकेचे अँथम गीत सुरू होते. सीएसकेचे अँथम गीत चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. 

चेन्नई आणि कोलकाताची आमने सामने कामगिरी
दरम्यान चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) संघातील आकडेवारी पाहता, चेन्नईचे पारडे कोलकातापेक्षा जड (CSK And KKR Head To Head Records) आहे. आतापर्यंत चेन्नई आणि कोलकाता संघ आयपीएलमध्ये २५ वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. यापैकी १७ सामने चेन्नईने तर ८ सामने कोलकाताने जिंकले आहेत. अर्थात चेन्नईने कोलकातापेक्षा दुप्पटीने जास्त सामने जिंकले आहेत.

मागील हंगामातील उभय संघांच्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१ मध्ये ३ सामने खेळले गेले होते. त्यातील तिन्हीही सामने चेन्नईने जिंकले होते. यामध्ये अंतिम सामन्याचाही समावेश होता.

चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने आणि प्रशांत सोलंकी.

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, सुनील नारायन, टीम साऊदी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या-

रैनाची नवी इनिंग, तर शास्त्रींचे पुनरागमन; ‘हे’ १० दिग्गज समालोचनाद्वारे करणार आयपीएलप्रेमींचे मनोंरजन

स्मिथचा जबरदस्त कॅच, पण डीआरएसची ‘गुगली’ अन् बाद होऊनही नाबाद राहिला आझम- Video

Video: मुंबई इंडियन्सचे सरप्राईस पाहून आठवणीत रमला सचिन तेंडुलकर; विनोद कांबळीचीही खास प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---