इंडियन प्रीमियर लीगचा ४ वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ पंधराव्या हंगामात अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. त्यांना हंगामातील १४ पैकी फक्त ४ सामने जिंकता आले आहेत आणि १० सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. चेन्नईच्या या निराशाजनक प्रदर्शनासाठी संघातील फलंदाजांचे सरासरी प्रदर्शन कारणीभूत ठरले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
चेन्नई संघाच्या (Chennai Super Kings) नावे यंदा आयपीएलमधील १० सामने गमावण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. याबरोबरच चेन्नई संघाला एक विशेष विक्रमही बनवता आलेला नाही. चेन्नई संघातील एकाही फलंदाजाला या हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई संघाने ही लाजिरवाणी कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. परंतु त्याची धावसंख्याही ४०० पेक्षा कमी आहे. त्याने १४ सामने खेळताना २६.२८ च्या सरासरीने ३६८ धावा केल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त चेन्नईचा एकही फलंदाज साध्या ३०० धावांचा आकडाही गाठू शकलेला नाही. यापूर्वीच्या १२ हंगामात दरवेळी चेन्नईच्या कोणत्या ना कोणत्या फलंदाजाने वैयक्तिक ४०० धावा केल्या आहेत.
सर्वाधिकवेळा ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाने (Suresh Raina) चेन्नईसाठी एका हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २००८, २००९, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१८ या आयपीएल हंगामात रैनाने ४०० हून अधिक धावा चेन्नईसाठी चोपल्या आहेत. तसेच तो चेन्नईसाठी सलग ७ हंगामात ४०० धावांचा आकडा गाठणारा एकमेव फलंदाजही राहिला आहे.
चेन्नईसाठी प्रत्येक हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा-
२००८- सुरेश रैना /एमएस धोनी
२००९- सुरेश रैना / मैथ्यू हेडन
२०१०- सुरेश रैना / मुरली विजय
२०११- सुरेश रैना/ मुरली विजय/ माइक हसी
२०१२- सुरेश रैना
२०१३- सुरेश रैना/धोनी/ माइक हासी
२०१४- सुरेश रैना/स्मिथ/मॅक्यूलम
२०१५- ब्रेंडन मॅक्यूलम
२०१८- सुरेश रैना/धोनी/वॉटसन/रायडू
२०१९- एमएस धोनी
२०२०- फाफ डू प्लेसिस
२०२१- फाफ डू प्लेसिस/ऋतुराज गायकवाड
२०२२- कोणीही नाही
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: मोईन अलीसमोर ट्रेंट बोल्टही हतबल, ओव्हरमधील सर्व ६ चेंडू केले सीमापार
वेध आशिया चषक अन् टी२० विश्वचषकाचे! भारतीय दिग्गजाने निवडली संभावित टीम इंडिया, ‘या’ खेळाडूंना संधी
शेन वॉर्न त्याला ‘गोव्याची तोफ’ म्हणायचा, वाचा त्या स्वप्निल अस्नोडकरची संघर्षगाथा