---Advertisement---

‘माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो,’ अभिनेत्रीसोबत आपले नाव जोडणाऱ्यांना ऋतुराजचा मराठीत टोमणा!

On: बुधवार, मे 12, 2021 10:32 AM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड हा आयपीएल २०२१ स्पर्धेत चांगल्याच फॉर्ममध्ये दिसून आला होता. त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ७५ धावांची महत्त्वाची खेळी केली होती. या खेळीमुळे त्याची सर्वच स्तरातून जोरदार प्रशंसा झाली होती. तसेच आता आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तरीदेखील ऋतुराज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.

मराठी अभिनेत्री सायली संजीव हिच्यासोबत त्याचे नाव जोडले गेल्याचे त्यांची चर्चा चालू आहे. परंतु आता ऋतुराजने सायलीसोबत आपले नाव जोडणाऱ्यांना त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

ऋतुराज क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो मैदानाच्या बाहेर आपल्या स्टाइल आणि लूक्ससाठी देखील तितकाच प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावर देखील प्रचंड ॲक्टिव असतो. नुकतीच त्याने मराठी अभिनेत्री सायली हिच्या फोटोवर कमेंट केली होती, जी चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून आहे.

सायलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही नवीन फोटोज् शेअर केले होते. ज्यावर ऋतुराज गायकवाडने “वोह..” अशी कमेंट केली होती. या कमेंटला प्रतिसाद देत सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता.

Photo Courtesy: Instagram/@ruutu.131

सायलीने यापुर्वीही केली होती कमेंट
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांच्या तुफानी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाला १८ धावांनी विजय मिळवण्यात यश आले होते. या सामन्यात ऋतुराजने ६४ धावांची खेळी केली होती. या सामन्यानंतर त्याने सामन्यातील आपला एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता, ज्यावर सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता. त्यामुळे दोघांचाही कमेंट गेम पाहून चाहत्यांना यांच्यात काहीतरी सुरू आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Photo Courtesy: Instagram/@sayali_sanjeev_official

ऋतुराजचे मराठी भाषेत प्रत्युत्तर
परंतु आता ऋतुराजने या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी ठेवली आहे. त्यामध्ये त्याने आयपीएल सामन्यादरम्यान आपण त्रिफळाचीत झालो असतानाचा फोटो जोडला आहे. यावर त्याने मराठी भाषेत भन्नाट असे कॅप्शन दिले आहे.

त्याने लिहिले आहे की, ‘माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो. आणि क्लिप बोल्डपण,’ असे त्याने कंसात लिहिले आहे. यापुढे त्याने हसण्याचे इमोजी टाकले आहेत. तसेच ‘कोणाचं काय तर कोणाचं काय,’ असेही खाली त्याने लिहिले आहे.

याबरोबरच फोटोच्या खाली त्याने लिहिले आहे की, ‘ज्यांना समजायचंय त्यांना समजलं. कोणीतरी खरं म्हणलंय, मिठ, मसाला आणि मिरची टाकली की चव येते.’

थोडक्यात सांगायचे झाले तर, आपले नाव अभिनेत्री सायलीसोबत जोडणाऱ्यांना ऋतुराजने अप्रत्यक्षपणे टोमणा मारला आहे.

Photo Courtesy: Instagram/@ruutu.131

कोण आहे सायली संजीव?
ऋतुराज गायकवाडच्या कमेंट बॉक्समध्ये झळकणारी सायली संजीव हीने प्रसिद्ध मराठी मालिका ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच आता ती कलर्स मराठी चॅनेलवर प्रदर्शित होत असलेल्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत काम करत आहे. लवकरच तिचा नवीन चित्रपट ‘झिम्मा’ प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये ती बोल्ड अवतारात दिसून येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चर्चा तर होणारचं! ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोवर मराठमोळा ऋतुराज घायाळ, दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

‘हे’ २ धाकड अष्टपैलू एकत्र खेळले तर भारत नक्कीच कसोटी चॅम्पियनशीप जिंकेल; माजी खेळाडूचे भाष्य

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी चर्चेत असलेले पारस महांब्रे आहेत तरी कोण? वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---